वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ आपल्यापर्यंत आला असून पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. दरम्यान व्हिडीओत महिला आपल्या जीवाला धोका असून येथून घेऊन चला अशी विनंती रुपाली चाकणकर यांना करत आहे.

रुपाली चाकणकर यांचं ट्वीट

“वर्धा भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत,” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीटमधून दिली आहे.

Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
sangli lok sabha seat, nana patole, sanjay raut, congress, shivsena uddhav thackarey, lok sabha 2024, election 2024, maha vikas aghadi, conflict in maha vikas aghadi, maharashtra politics, maharashtra news, marathi news, sangli news, election news,
“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”

व्हिडीओत काय आहे –

१२ सेकंदाच्या या व्हिडीओत दिसणारी महिला सांगत आहे की, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे येथे, मॅडम प्लीज मला येथून घेऊन चला. मी विनंती करते”.

कडक कारवाईची मागणी

रुपाली चाकणकर यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “रामदास तडस यांचे कुटुंबीय, मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून महिलेला मारहाण करत असून प्रचंड मानसिक त्रास दिला जात आहे. महिलेची अवस्था फार वाईट असून खूप घाबरलेली आहे. ती बोलूही शकत नाही. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे कडक कारवाई करावी”.