“भाजपाने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवले आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपा प्रचारात उतरायला तयार नाही आणि दुसरीकडे ठाणे मतदारसंघ आम्हालाच हवा, असा दबाव त्यांनी कायम ठेवला आहे. आपल्या घरात आपण राजे असतो पण परक्याच्या घरात आपल्याला तशी वागणूक मिळत नाही. काहीशी अशीच स्थिती सध्या दिसते आहे. तुमचा वापर केला जाणार होता, हे त्यांना आधीच कळायला पाहिजे होते.
दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान्न होते, ज्या घरात सोन्याच्या ताटात जेवण मिळत होते, तिथे तुम्हालाच पत्रावळीवर जायची इच्छा झाली आणि शिंदे गटाने स्वतःचे वाटोळे करून घेतले”, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेलाही जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मृत्यूनंतर आत्म्याच्या गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे यांना शरद पवारांचा मृत्यूच हवा आहे. शरद पवार जोपर्यंत जात नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही, अशी काहीशी भावना एनडीएनध्ये निर्माण झालेली दिसते. “यांची शेवटची सभा कधी होणार माहीत नाही”, असं अजित पवार म्हणाले. ही काय प्रचाराची पातळी झाली का? एखाद्या वयोवृद्ध माणसाने शंभर वर्षे जगावे, असे आपण बोलतो. पण हे त्यांच्या मृत्यूची वाट बघायला लागले आहेत. महाराष्ट्र हे सहन करणार नाही.

Six months ago I told Ajit Pawar that I will not take up the post of guardian minister of Gondia says Dharmaraobaba Atram
पालकमंत्री पद झेपणार नाही, हे अजित पवारांना आधीच…
Even after the victory in Thane Ganesh Naik and Eknath Shinde not coming together
ठाण्यातील विजयानंतरही नाईक-शिंदे मनोमिलन दूरच?
Loksatta anvyarth Deputy Chief Minister Ajit Pawar expressed opinion that the Grand Alliance has suffered losses in the elections due to the onion issue
अन्वयार्थ: किती काळ रडत बसणार?
Eknath shinde and nitish kumar
“४०० पारच्या घोषणेमुळे गडबड झाली”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानंतर जदयू नेते म्हणाले, “निवडणुकीत…”
Sanjay Raut and Praful Patel
“…म्हणून अजित पवार गटाला मंत्रिपद नाही”; दाऊदच्या प्रॉपर्टीचा उल्लेख करत संजय राऊतांचा मोठा दावा
Liquor Ban decision, Liquor Ban decision in chandrapur, bjp Liquor Ban decision, chandrapur lok sabha seat, bjp candidate lost Chandrapur, bjp candidate lost Chandrapur due to Liquor Ban decision, lok sabha 2024,
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : दारूबंदीचा निर्णय भाजपला भोवला
Ajit Pawar Yugendra Pawar Sharad Pawar
शरद पवार बारामती विधानसभेत युगेंद्र पवारांना अजित पवारांविरोधात उभं करणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले…
Sushma Andhare on Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्झिट’ नक्की, आता विनोद तावडे…”, सुषमा अंधारे यांचं सूचक विधान

संविधान बदलणार ही भाजपाची घोषणा

४०० हून अधिक जागा मिळाल्यानंतर संविधान बदलू, अशी घोषणा भाजपाच्या १५ खासदारांनी जाहीर मंचावरून बोलताना दिली होती. त्यानंतर हा विषय अंगावर येतोय, असे दिसल्यानंतर भाजपाने पुन्हा माघार घेतली.

निवडणूक रोख्यात चोरी कुणी केली? हे वेगले सांगायला नको. निवडणूक रोख्यांची माहिती बाहेर काढल्यास भारतात हाहाःकार माजेल असे सरकारी वकील तुषार मेहता यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून माहिती उघड करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आग्रही भूमिकेमुळेच भारतातील सर्वात मोठा भ्रष्टाचार उघडीस आाला.