Maharashtra Assembly Election Sharad Pawar NCP 5th Candidate List Announced : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु आहे. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही तास बाकी असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पाच जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून एक्सवर (ट्विटर) पाच उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील, मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शीमधून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत, मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या होत्या.
कृपया प्रसिद्धीसाठी…
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 29, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/6idD0OGYmw
हेही वाचा : Supriya Sule : “कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन…”, सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका
पंढरपूरमध्ये दोन उमेदवार दिल्याने मविआत बिघाडी?
काँग्रेस पक्षाने याआधी पंढरपूरमधून भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून पंढरपूरमधून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार देण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली? वाचा यादी!
मतदारसंघाचे नाव | उमेदवारांचे नाव | |
१ | माढा | अभिजीत पाटील |
२ | मुलुंड | संगीता वाजे |
३ | मोर्शी | गिरीश कराळे |
४ | पंढरपूर | अनिल सावंत |
५ | मोहोळ | राजू खरे |
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत एकूण पाच याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये २४ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी २२ उमेदवारांची दुसरी यादी तर २७ ऑक्टोबर रोजी ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली. यानंतर आज २९ ऑक्टोबर रोजी ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.