Amol Kolhe On Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. खरं तर या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात प्रचारासाठी दिग्गज नेते सभा घेताना पाहायला मिळत आहेत. यातच सत्ताधारी आणि विरधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. “चुकीला माफी होऊ शकते, पण गद्दारीला माफी नाही”, असं अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“अशा प्रकारची परिस्थिती ओढावत असेल तर मी जे म्हणालो त्या पद्धतीने चुकीला माफी होते. पण गद्दारीला माफी होत नाही. एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याला जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा कौल काय? हे लक्षात घ्यायला हवं. उपमुख्यमंत्री अजित पवार गेली ३० ते ३५ वर्ष समाजकारण आणि राजकारणात आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात नेमकी काय हे त्यांना नक्कीच कळलं असेल. त्यामुळे त्यांना भावनिक आवाहन करावं लागत असेल. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडी सत्तेत आणायची. पक्ष फोडणं आणि चिन्ह पळवणं याला महाराष्ट्रात थारा नाही, अशी टीका नाव न घेता अमोल कोल्हे यांनी महायुतीसह अजित पवार यांच्यावर केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : “मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी…”, व्हिडीओ व्हायरल होताच बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील काही सभांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आणखी काही नेत्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. यावर विरोधकांनी टिकेची झोड उठवली. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांनीही भाजपावर टीका केली. अमोल कोल्हे म्हणाले, “मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी एक प्रकारे कबुली दिली आहे की, १० वर्ष सत्तेत असल्यानंतरही ते देशाला सुरक्षित ठेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ही कबुली दिली की काय? हा प्रश्न निर्माण होतो. तसेच ‘बटेंगे तो कटेंगे’ असा प्रचार महायुतीला करावा लागत असेल तर मग या सरकारने काय विकास केला?”, असा हल्लाबोल अमोल कोल्हे यांनी केला.

Story img Loader