पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श ही आलिशान कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. ही घटना घडल्यानंतर आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला न्यायालयाने निबंध लिहायला सांगत काही अटी घालत जामीन दिला होता. त्यानंतर संत्पत प्रतिक्रिया प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर या प्रकरणात पोलीसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाचे वडील, आजोबा, पब चालक, व्यवस्थापक यांना अटक केली. तसेच आरोपीलाही पुन्हा बाल न्याय मंडळासमोर हजर केलं असता बाल न्याय मंडळाने १४ दिवसांसाठी आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी केली.

यानंतर आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टरांनाही अटक झाली. तसेच कारवाई करण्यात उशीर केल्याप्रकरणी दोन पोलिसांचेही निलंबित झाले. यानंतर आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आरोपीच्या आईचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली. पोर्श कार अपघात प्रकरणावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत या संपूर्ण घटनेवर भाष्य करत संताप व्यक्त केला आहे.

Sharad pawar on Ajit pawar Baramati Lok Sabha result
Sharad Pawar on Ajit Pawar : ‘अजित पवारांनी विकास कामं केली तरी लोकांनी सुनेत्रा पवारांना का नाकारलं?’, शरद पवार म्हणाले, “शेवटी ती बारामती…”
cm eknath shinde
भारतीय संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांची टीका; CM शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “कसाबला…”
Vice President question on P Chidambaram criticism about Parliament print politics news
आम्ही संसदेत ‘पार्ट टाइमर’ आहोत काय? चिदम्बरम यांच्या टीकेवर उपराष्ट्रपतींचा सवाल
Poster War in Vidhan Parishad
टीम इंडियाच्या सत्कारावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांचा ‘सामना’, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी
Sanjay Raut on Pm Narendra Modi Speech
‘बालबुद्धीच्या नेत्यानेच मोदींना घाम फोडला’, संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका
Vidhan Parishad Adhiveshan Devendra Fadnavis Ambadas Danve
अंबादास दानवेंवरील कारवाईच्या प्रस्तावावर चर्चेला नकार दिल्याने विरोधकांचा गोंधळ, फडणवीस संतापले, नेमकं काय घडलं?
Kangana Ranuat and Ravi kishan slams rahul gandhi
“राहुल गांधींचे भाषण म्हणजे स्टँडअप कॉमेडी…”, खासदार कंगना रणौत, रवि किशन यांची टीका
Devendra Fadnavis and bhaskar jadhav
भास्कर जाधवांनी सभागृहात वाचून दाखवला व्हॉट्सअप मेसेज; फेक नरेटिव्हचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “मी आता…”

हेही वाचा : पोर्श कार अपघात प्रकरण : आमदार सुनील टिंगरेंनी दबाव आणला का? अजित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…

“या अपघात प्रकरणानंतर पोलीस अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस आले, डॉक्टरांनी हात धुवून घेतले, आरटीओनी डोळे मिटून दूध पिलं, राज्य उत्पादन शुल्क विभाग नशेत आहे, या किडलेल्या व्यवस्थेची बायपास सर्जरी करावी लागणार आहे”, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“कल्याणीनगरमध्ये दोन निष्पापांना गाडीखाली चिरडल्यानंतर किडलेल्या संपूर्ण यंत्रणेचंच पितळ उघड पडलं. पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस आले. डॉक्टरांनी हात धुवून घेतले. आरटीओने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं. बाल न्याय मंडळानेही ‘निबंध’ लिहायला सांगून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला एका दिवसात मोकळं सोडलं. एरवी रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडूनही दंड वसूल करणाऱ्या महापालिकेलाही मग जाग आली आणि त्यांनी घाऊक स्वरुपात हॉटेलांवर कारवाई करुन हातावर पोट असलेल्या अनेक सामान्य कामगारांच्या नोकऱ्यांचा घोट घेतला. हे संपूर्ण व्यवस्था सडल्याचंच लक्षण आहे. इतरही सगळ्या विभागात हेच सुरु असून सामान्य लोकांसाठी काम करणं अपेक्षित असलेली ही व्यवस्था सरकार कुणाचंही असलं तरी केवळ पॉवरफुल लोकांना पायघड्या घालून त्यांच्यासाठीच काम करताना दिसते, म्हणून सामान्य लोकांनाच दबाव आणून या किडलेल्या व्यवस्थेवरच बायपास सर्जरी करावी लागणार आहे. नाहीतरी आज त्या दोन मृतांना न्याय मिळण्याची जी काही शक्यता निर्माण झाली, तीही केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच, हे विसरता येणार नाही”, असं रोहित पवार यांनी एक्स या सोशम माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.