Jayant Patil On Ajit Pawar : राज्याच्या विधासभेची निवडणूक पुढील दोन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबतही सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरु आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “अजित पवार हे महाविकास आघाडीत असते तर मुख्यमंत्री झाले असते”, असं सूचक विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी ठाण्यात बोलताना मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाष्य केलं होतं. मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. यावर आज जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीत असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले असते. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे. आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं वातावरण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ते (अजित पवार)असते तर त्यांना परिस्थिती सोईची झाली असती”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
Sharad Pawar : ‘राज ठाकरेंची गाडी तुम्ही अडवायला सांगितली?’, या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले; “त्यांनी माझं नाव…”
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sharad Pawar Prithviraj Chavan fb
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवार म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाणांनी…”
vijay wadettiwar reaction on ravi rana
Vijay Wadettiwar : “रवी राणा जे बोलले, तेच सरकारच्या मनात”, लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले…
Supriya Sule and Ajit Pawar
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’, सुप्रिया सुळेंचं उत्तर; म्हणाल्या, “त्या दिवशी…”
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…

हेही वाचा : मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवार म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाणांनी…”

आरक्षणाबाबत सरकारने निर्णय घ्यावा

“मराठा आरक्षणाबाबतची आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आता सरकारचा निर्णय सरकारने जाहीर करायचा आहे. सरकार मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही बाजूंनी बोललं आहे. त्यामुळे सरकारची त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली? हे आम्हाला माहिती नाही. सरकारने काय आश्वासन दिलं हे देखील आम्हाला माहिती नाही. आरक्षणाबाबत सरकारने आता निर्णय घ्यावा”, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

अनेकजण संपर्कात, पण…

“अनेकजण संपर्कात आहेत. पण ते आमच्याबरोबर येतील असा गैरसमज मी करणार नाही. कारण त्यांचं तिकडे व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे त्यांना आता इकडे येणं योग्य वाटत नसेल असं मला वाटतं. त्यामध्ये ईडीची टांगती तलवार आहे, त्यामुळे आमच्याकडे येण्यास जास्त कोणी उत्सुक नाही”, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९९ साली तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २००४ साली आमदार झाले. या दोघांच्या आधी मी आमदार झालो. पण, ते माझ्या मागून येऊन पुढे गेले. कधी कधी मी गंमतीमध्ये सांगतो की, एकनाथ शिंदे यांना आमदार घेऊन आणल्यावर मुख्यमंत्री करणार असे तुम्ही सांगितले होते, मग जर मला सांगितले असते तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.