संजय राऊतांसोबत डान्स केल्यानंतर होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या “आमच्या घरातल्या मुलीचं…”

संगीत कार्यक्रमातील संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता

NCP, Supriya Sule, Shivsena, Sanjay Raut, Sanjay Raut Daughter Wedding,
संगीत कार्यक्रमातील संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. दरम्यान लग्नाआधी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमातील संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. संगीत कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी केलेल्या डान्सची चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान यावरुन काहींनी टीकादेखील केली होती. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

VIDEO: ‘‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ…”, संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत ‘भन्नाट’ डान्स

सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार?”. ते आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

संजय राऊत- सुप्रिया सुळे यांच्या डान्सबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले,…

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचा सोमवारी २९ नोव्हेंबरला विवाहसोहळा पार पडला.ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. यावेळी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

विखे पाटलांनी केली होती टीका

भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. विखे पाटील म्हणाले होते की,, “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp supriya sule on dance with shivsena sanjay raut in his daughter wedding music program sgy

ताज्या बातम्या