राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली होती. विरोधकांकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं आहे. त्या अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. यादरम्यान मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं.

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…
pimpri, Maval constituency, Lok Sabha 2024, bjp affiliated, National Labor aghadi, Worker s Representative,
मावळमधून कामगारांच्या प्रतिनिधीला संधी द्या, भाजपशी संलग्न राष्ट्रीय श्रमिक आघाडीची मागणी

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

दरम्यान शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील तर भाजपाने पाठिंबा द्यावा असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, “मला याबदल काहीच माहीत नाही. मी एका संघटनेत काम करते, मी एक खासदार आहे त्यामुळे मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो”. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी यावेळी आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊतांवर नाराज? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

राज्यात काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा पाठिंबा राहील असं जाहीर केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे”. दुसरीकडे आपचे संजय सिंग यांनीही शरद पवारांना रविवारी फोन केला होता.

आघाडीच्या पराभवाबद्दल शरद पवारांची नाराजी ; मंत्र्यांची कानउघडणी

दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. या बैठकीत निवडणुकीसाठीच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील या निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया २१ जुलै रोजी पार पडेल.