विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. ज्या प्रकारे अधिवेशनात टीका केली गेली तसंच उद्धव ठाकरे यांनी जी वक्तव्यं केली त्याचाही समाचार घेतला. जयंत पाटील आज सभागृहात नाहीत पण ते योग्यच बोलले असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांच्या वाक्याचा संदर्भ घेत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”
CM Eknath Shinde
“…म्हणून त्यांचा टांगा पलटी करावा लागला”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray in Ramtek Lok Sabha constituency campaign
बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, ‘हे’ घरगडी समजत होते; एकनाथ शिंदे यांची टीका
nagpur bhaskar jadhav marathi news, bhaskar jadhav eknath shinde marathi news
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राजकीय निवृत्ती घेतील का?”; भास्कर जाधव म्हणाले, “तीन खासदारांचे तिकीट नाकारून…”

जयंत पाटील आज सभागृहात नाहीत पण ते बोलले ना राष्ट्रवादीची शिवसेना. होय ते बरोबर बोलले राष्ट्रवादीची शिवसेना असल्यानेच आम्ही मोठा निर्णय घेतला असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. आता सांगत आहेत फेब्रुवारीत सरकार पडणार. जसं काय जज यांना रोज फोन करून सांगतात की मी असा निकाल देणार आहे. माझा स्वभाव टीका करण्याचा नाही म्हणून मी शांत आहे पण त्याला माझी कमजोरी समजू नका. बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

मुख्यमंत्रीपदाची हवा उद्धव ठाकरेंच्या डोक्यात गेली

मुख्यमंत्रीपदाची हवा त्यांच्या (उद्धव ठाकरे) एवढी डोक्यात गेली होती की मी या पदावर बसलो म्हणजे हात आकाशाला लागले. देवेंद्र फडणवीस यांनाही अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. कशी सत्ता राबवत होतात तुम्ही तेव्हा? अधिकाऱ्याचं नाव घेत नाही पण आमच्यासकट अनेकांच्या चौकशा लावण्याचं काम केलं. आम्हाला सांगितलं जातं आहे सत्तेची मस्ती नको तेव्हा कोणती मस्ती होती मग? ज्या सरकारमधला मंत्री दाऊदसोबतच्या संबंधांमुळे तुरुंगात गेला त्या व्यक्ती आम्हाला कायदा सुव्यस्थेच्या गोष्टी कशा शिकवत आहेत? जेव्हा आम्हाला ही परिस्थिती असह्य झाली तेव्हा आम्ही तख्तच पलटवून टाकलं. आमचे राजीनामे मागितले तुमचे मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा का नाही घेतले राजीनामे? असाही प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.

२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्यानंतर सरकार बदललं. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तसंच हा वाद जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेला तेव्हा निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. मात्र हे बंड झाल्यापासून सातत्याने उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांचा उल्लेख गद्दार असा करत आहेत. तसंच त्यांच्यावर टीका करत आहेत. या सगळ्याचा समाचार आज सभागृहात एकनाथ शिंदे यांनी घेतला.

म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला

हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा असा टोमणा मला मारण्यात आला होता. मग मी म्हणतो अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचं हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, सरकारच बदललं.
महिला भगिनी आमदारांबाबत काय भाषा वापरली गेली?
आमच्या बरोबर जेव्हा महिला भगिनी आमदार आल्या तेव्हा कुठल्या पातळीची टीका झाली? अजित पवार काल आमच्या लोकांना निर्लज्ज म्हणून मोकळे झाले पण त्यांच्या लोकांना तुम्ही काहीही बोलत नाही. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी सरकारच्या विरूद्ध बोललं की घरी बुलडोझर जायचे.तुमच्याकडे राज्य असताना काय सुरू होतं? ती कंगना जेव्हा मुंबईबाबत बोलली तेव्हा कंगनाचं घर तोडण्यासाठी एका वकिलाला ८० लाख रूपये दिले गेले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्यांना…
रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणणार होते म्हणून १३ दिवस तुरुंगात टाकलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे कुठे पळून जाणार होते? त्यांना जेवत असताना ताटावरून उठवण्यात आलं आणि अटक करण्यात आली. पत्रकार राहुल कुलकर्णी, पत्रकार अर्णब गोस्वामी या पत्रकारांना अटक केली. का तर तुमच्याविरोधात बोलले म्हणून. ते तर फक्त बोलले होते. आमच्यावरही आता टीका केली जाते आहे मात्र आम्ही कुणाला उठून जेलमध्ये टाकत नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही फक्त सांगतो आहे चांगलं काम करतोय ते पण छापा.