शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. एन. डी. पाटील यांचा अंत्यविधी उद्या २० जणांचा उपस्थितीत होणार नारायण ज्ञानदेव पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी हे शिक्षण घेतलं होतं. अध्यापन कार्य - १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य. शैक्षणिक क्षेत्रातील कार्य - शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासूनरयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासूनदक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून राजकीय कारकीर्द - १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकारमहाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते मिळालेले पुरस्कार/ सन्मान - भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवीशाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार भूषविलेली पदे - रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्यसमाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्षअंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्षडॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्षजागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रकम.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्षदक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्षमहाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य प्रसिद्ध झालेले लेखन - समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )