scorecardresearch

Premium

“युतीत ताकद दाखवावी लागेल, तरच…”, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान

अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

prafull patel
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (फोटो-फेसबुक)

एकनाथ शिंदे गटानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गट युतीत सामील झाल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या जागेवरून पेच निर्माण झाला आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? यावरून तर्क वितर्क लढवले जात आहेत. या जागांसाठी तिन्ही पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.

युतीत सामील झाल्यानंतर आता आपल्याला ताकद दाखवावी लागेल, तरच हक्काने जागा मागता येतील, असं सूचक वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं. ते मुंबईत अजित पवार गटाच्या कार्यक्रमात बोलत होते. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अनेक नेते आणि मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.

Ram Lalla Murti Has Changed Ayodhya Ram Mandir Arun Yogiraj Reaction Says This is Not My Work How Krishna Sheela Was Carved
“रामलल्ला बदलले, हे माझे काम नाही..”, मूर्तिकार अरुण योगीराज यांची माहिती, म्हणाले, “मूर्ती तयार झाली त्यावेळेस..”
ajit pawar latest news in marathi, parth pawar gajanan marne marathi news
गुंड गजानन मारणे, पार्थ पवार भेटीवर अजित पवार म्हणाले, “अतिशय चुकीची…”
mamata banerjee on ram mandir
भाजपा महिला विरोधी; प्रभू रामाचा जयजयकार करताना सीता मातेचा विसर, ममता बॅनर्जींची टीका
PM Narendra Modi at Ayodhya
अयोध्येतून येताच पंतप्रधान मोदींचा पहिला मोठा निर्णय; “एक कोटी घरांवर…”

हेही वाचा- “…तेव्हापासून पंकजा मुंडेंचं खच्चीकरण सुरू झालं”, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं मोठं विधान

यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत, म्हणजेच महाराष्ट्राच्या १५ टक्के जागा केवळ मुंबईत आहेत. हे आपण विसरून चालणार नाही. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मिळून विधानसभेच्या ६० जागा आहेत. एवढ्या मोठ्या भागात आपण राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट केलं नाही तर आपण महाराष्ट्रात मजबूत आहोत, असं कसं सांगता येईल.”

हेही वाचा- “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा

“आज आपण युतीमध्ये गेल्यानंतर आपली ताकद दाखवल्याशिवाय कुणी आपल्याला न्याय देईल, अशी अपेक्षा कसं काय बाळगू शकतो. त्यामुळे आपल्या सर्वांना तिथे आपली ताकद उभारावी लागेल. त्याशिवाय हक्काने कुठलीही जागा मागता येणार नाही,” असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Need to show our strength ajit pawar faction prafull patel statement about yuti vidhansabha election rmm

First published on: 27-09-2023 at 19:23 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×