neelam gorhe criticized kirit somaiya and navneet rana rno news ssa 97 | Loksatta

“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”

Neelam Gorhe : निलम गोऱ्हे यांनी राज्यातील रोजगारावरून भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, ‘स्थगिती सरकार’ असल्याचा आरोप देखील केला आहे.

“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”
निलम गोऱ्हे किरीट सोमय्या नवनीत राणा ( फोटो – संग्रहित )

शिवसेनेचा दसरा मेळावा आणि संघटना बांधणीसाठी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे या बीड जिल्हा दौऱ्यावर आहे. यावेळी निलम गोऱ्हे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने दोन जणांना रोजगार मिळवून दिला आहे. तो म्हणजे किरीट सोमय्या आणि नवनीत राणा, अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी सोमय्या आणि राणांचा समाचार घेतला आहे.

“महाविकास आघाडी सरकारच्या काळात जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र, राजकीय स्वार्थासाठी त्यांना स्थगिती देण्यात येत आहे. राज्यातील उद्योग-धंदे अन्य ठिकाणी जात आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मात्र, यांचे वेगळेच उद्योग सुरु आहे,” असा आरोप निलम गोऱ्हे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा

“पंकजा मुंडे लोकनेत्या आहेत”

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वादावर निलम गोऱ्हे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. “पंकजा मुंडेंना मी बऱ्याच वर्षापासून ओळखते, त्या लोकनेत्या आहेत. त्यांचे काम देखील चांगलं त्या काय बोलल्या माहीत नाही. मात्र, त्यांची प्रगती व्हावी,” अशा शुभेच्छा निलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला!

संबंधित बातम्या

“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”
“गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”, उदय सामंतांचा मोठा दावा; ठाकरे गटाची चिंता वाढणार?
“मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!
शिंदे गट भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार? उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार
पालकांसाठी ‘बालभारती’ची उजळणी..