सोलापूर : मुख्यमंत्री, लोकसभा सभापती आणि शिवसेना नेते म्हणून मनोहर जोशी यांनी मराठी माणूस, मराठी भाषा, हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा – वनखात्यातील वनरक्षक भरतीप्रक्रिया; शारीरिक चाचणीत अव्यवस्थेचा आरोप

हेही वाचा – ..अन् मनोहर जोशींचे विरोधी पक्षनेते पद गेले, काय घडले होते नागपूर अधिवेशनात ?

शुक्रवारी सकाळी सोलापुरात असताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, मनोहर जोशी आणि माझा ३५ वर्षांपेक्षा अधिक काळाचा परिचय होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अनुयायी म्हणून त्यांना निष्ठेने साथ दिली होती. महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सैनिकी शाळा, बचत गटांना चालना आणि महिला आरक्षणाबद्दलसुद्धा त्यांनी अनुकूल भूमिका घेतली होती, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.