Neelam Rane on Nitesh Rane and Nilesh Rane : कोकणात राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही बंधू वेगवेगळ्या निशाणी घेऊन लढत आहेत. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने कोकणातही प्रचाराचा धुरळा उडाला आहे. दरम्यान, मला नितेश राणेची चिंता नाही. मी कुडाळ मालवणकडे जास्त फोकस केलंय, अशी प्रतिक्रिया राणे बंधूंच्या मातोश्री आणि खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी दिली आहे. त्या टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या दोन्ही सुपुत्रांना उतरवलं आहे. त्यातील कणकवली वैभवाडी विधानसभा मतदारसंघात नितेश राणे हे विद्यमान आमदार असल्याने भाजपाने त्यांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे निलेश राणे यांना कुडाळ मालवणमधून उमेदवारी देण्यात आली. हा मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्याकडे गेल्याने शिवसेनेने निलेश राणे यांना आयात करून त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे एकाच घरातून दोघेजण निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कुटुंबीयांची प्रचारासाठी दमछाक होते आहे. याबाबत नीलम राणे म्हणाल्या की, आम्ही दोन दोन तालुके ठरवून प्रचार करत आहोत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >> विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?

नीलम राणे म्हणाल्या, “कुटुंबातून दोघेजण उभे आहेत. पहिल्यांदाच असं झालंय. त्यामुळे दोन गावं मालवणचे, दोन गावं कणकवलीचे ठरवून प्रचार करत आहोत. जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. नितेश राणे दोनदा जिंकून आलाय. त्याचा काही प्रश्न नाहीय. मी कुडाळ मालवणला जास्त फोकस करतेय. त्या तालुक्यातील गावेही लांबलांब आहेत.”

“सकाळी १० वाजल्यापासून शेड्युल सुरू होतं. रात्री घरी जायला १२ वाजतात. गावे लांब असल्याने गावागावात जावं लागतं. सध्या शेतकापणीची कामं सुरू झाल्याने महिला संध्याकाळी उशिरा येतात. त्यामुळे रात्री उशीर होतो. दिवसभराचं काम करून आम्ही काय सांगतोय, हे त्या बिचाऱ्या ऐकून घेत असतात. त्यांना निलेश आणि नितेशचं काम पोहोचवत असतो”, असंही त्या म्हणाल्या. “एकत्र प्रचार करत असलो तरीही सगळीकडे सर्वजण पोहोचू शकत नाहीत. विरोधी पक्षांची जिथे जास्त मते आहेत, तिथे जाऊन मी महिलांना पटवून सांगत असते”, असंही त्यांनी सांगितलं.

नितेश राणेंच्या वक्तव्यांची भीती वाटते

नितेश राणे सातत्याने हिंदू धर्माबाबत भाषण करत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद होतात. याबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, “आई म्हणून खूप भिती वाटते. ज्या लोकांबद्दल तो बोलतो, त्यानुसार लोकांचा भरोसा नसतो. चार पोलीस देऊन माणसाचं रक्षण होत नाही. असे अनेक प्रसंग घडले आहे. त्यामुळे आई म्हणून फार भीती वाटते. शेवटी त्याला जे वाटतं ते तो बोलतो. वडिलांनाही भीती वाटते. आम्ही वेळोवेळी सांगत असतो. पण तो मला सांगत नाही कुठे जातोय हेही सांगत नाही.”

Story img Loader