Covid-19: आता फक्त ३५० रुपयांत होणार RTPCR चाचणी; जाणून घ्या राज्यशासनाने निश्चित केलेले नवे दर

एन ९५ मास्कचे कमाल दर १४ ते ४९ रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहेत.

corona update india today

करोनाची लागण झाली आहे का? याबद्दल माहिती देणारी महत्वाची चाचणी म्हणजे RT-PCR चाचणी. या चाचणीचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसवणारे होते. मात्र आता या चाचणीचे दर कमी झाले आहेत. शासनाने एक परिपत्रक काढत या नव्या दरांची घोषणा केली आहे.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातल्या औद्योगिक औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. तसेच परिवहन व्यवस्थाही सुरू झाली आहे.

तपासणीसाठी आवश्यक रिएजंट्स, व्हीटीएम कीट्स, पीपीई कीट्स, आरएनए एक्स्ट्रॅक्शन कीट हे माफक दरात उपलब्ध झाले असून एन ९५ मास्कचे कमाल दर १४ ते ४९ रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहेत.

खासगी प्रयोगशाळांसाठी कोविड- १९ चाचणीचे दर सर्व करांसह निश्चित करण्यात आले आहेत. हे दर खालीलप्रमाणे-

१. तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने चाचणीसाठी नेणे, येण्याजाण्याचा खर्च, आवश्यक सामग्रीसह दर – ३५० रुपये
२. विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, कोविड चाचणी बुथ यासाठी सर्व साहित्यासह दर – ५०० रुपये
३. रुग्णाच्या घरात जाऊन नमुने घेणे, येण्याजाण्याचा, नमुन्यांना घेऊन जाण्याचा खर्च, अहवालासाठी लागणारं साहित्य तसंच इतर आवश्यक सामग्रीसह खर्च – ७०० रुपये

इतर चाचण्या

ELISA for SARS Covid-2 Antibodies Test
१.रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – २०० रुपये
२. तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास – २५० रुपये
३. रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास – ३५० रुपये

CLIA for SARS Covid-2 Antibodies Test
१.रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – ३०० रुपये
२. तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास – ४०० रुपये
३. रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास – ५०० रुपये

Rapid Antigen Test for SARS Covid-2
१.रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – १०० रुपये
२. तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास – १५० रुपये
३. रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास – २५० रुपये

CB-NAAT /TRUENAT
रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – १२०० रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New rates of rtpcr tests in maharashtra private labs vsk

ताज्या बातम्या