पुणे-कोल्हापूर महामार्गावर सातारा जिल्ह्य़ात अपघातप्रवण अशी आठ क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट) असल्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अभ्यास केला असून नीरा नदीच्या पात्रातील पुलाचा त्यात नव्याने समावेश केला आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर नीरा नदी पात्रात गाडी पडून झालेल्या अपघात स्थळाची पाहणी करून त्या ठिकाणी कोणत्या त्रुटी आहेत याची माहिती सध्या घेण्यात येत आहे. पुणे-सातारा महामार्गातच शिंदेवाडी (ता. खडाळा) वेळे ,कवठे, जोशीविहीर, भुईंज, पाचवड सातारा दोन (फलटण फाटा व गोडोली) असे आठ ब्लॅक स्पॉट आहेत. अशा ठिकाणी तीव्र वळण अथवा उतार सíव्हस रोडवरून मुख्य रस्त्यावर येणारी वाहतूक अशा समस्या आहेत.
दरम्यान नीरा नदी पात्रातील पुलाचा यात नव्याने समावेश करण्यात आला आहे. या पुलावर गडबडीच्या वेळेला गाडी थेट नदी पात्रात जाईल. एवढी माठी जागा पुलावर मोकळीच असून तेथे संरक्षणाच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळेच गाडी खाली गेल्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.