भुईंजमधील वृत्तपत्र विक्रेते महादेव निकम यांचे निधन

भुईंज येथील ज्येष्ठ नागरिक व वृत्तपत्र विक्रेते महादेव कोंडिबा निकम (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

भुईंज येथील ज्येष्ठ नागरिक व वृत्तपत्र विक्रेते महादेव कोंडिबा निकम (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वाई तालुक्यातील महामार्ग परिसरातील व किसन वीर कारखाना परिसरातील जुन्या पिढीतील ते वृत्तपत्र विक्रेते होते. सुरुवातीपासून ते लोकसत्ता व इंडियन एक्सप्रेसचे विक्रेते होते. मूळ चिधवली गावचे रहिवासी होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते सायकलवरून ग्रामीण भागात वृत्तपत्र विक्रीचे काम करत. या व्यवसायात त्यांची तिसरी पिढी सध्या काम करत आहे. त्यांच्या अत्यंयात्रेत सर्व स्तरांतील समाज सहभागी झाला होता.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Newspaper vendor mahadeo nikam died of bhuinj

ताज्या बातम्या