महाराष्ट्राच्या राजकारणात अस्सल कोकणीपणा ठसवणारे नारायण राणे यांनी आज पहिल्यांदाच आपल्या बालपणीचे किस्से उलगडले आहेत. नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. परंतु, त्यात बालपणीविषयी लिहिलेले नाही. परंतु, आज पहिल्यांदा त्यांनी खुल्या व्यासपीठावर त्यांचं बालपणं मांडलं. यामध्ये त्यांचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय याविषयीची माहिती दिली. ते एबीपी माझाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

नारायण राणे म्हणाले की, “मी आत्मचरित्रातही माझ्या बालपणाचा उल्लेख केलेला नाही. ठराविक वयानंतरचं माझं आत्मचरित्र लिहिलं. वडिल मफतलाल मिलमध्ये कामाला होते. मी पाचवीत असताना ते आजारी पडले. काम करणं त्यांना अशक्य झालं. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. मग ते माझ्या भावंडांना ते घेऊन गावी गेले. तेव्हा मी सहावीत गेलो होतो. माझ्या आईने मला मामांकडे चेंबुरला सोडलं.”

teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

हेही वाचा >> “१० जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार” भाजपा आमदार नितेश राणेंचा दावा

“लहानपण जे अपेक्षित असतं तसं माझं गेलं नाही. पण मी सांगायचा प्रयत्नही करत नाही. लहापनणातच सहावीत चेंबुरला आलो. आठवीत गेल्यानंतर नाईट शाळेत गेलो, दिवसा नोकरी करत होतो. आठवी ते अकरावीपर्यंत सात नोकऱ्या केल्या. अकरावी पास झालो आणि मला इन्कम टॅक्सचा कॉल आला. परीक्षा पास झालो आणि इन्कम टॅक्समध्ये नोकरी मिळाली”, अशी माहितीही त्यांनी पुढे दिली.

“मी क्रिकेट चांगले खेळायचो. त्यामुळे इन्कम टॅक्स ऑफिसच्या क्रिकेट टीममध्ये क्रिकेट खेळायचो. नोकरी करत असताना आठवीपासूनच लहान-मोठे व्यवसाय करू लागलो. नोकरीला लागलो तेव्हाही माझे व्यवसाय होते. गॅरेज, फटाक्यांचा व्यवसाय सुरू केला. आमदार झालो तेव्हा हॉटेलिंगच्या क्षेत्रात आलो. गावी असलेली चार भांवडं, आई वडिल यांना मनी ऑर्डर पाठवावी लागत होती. वडिल सांगायचे व्यवसायातले पैसे नको. म्हणून ३१ तारखेला नोकरीचा पगार घेतला की १ तारखेला संपूर्ण पगार गावी पाठवायचो. १९७१ साली दीड हजार पगार होता”, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >> “यावर चित्रपट काढण्याची क्षमता आहे का?”, जितेंद्र आव्हाडांनी केरळमधील जोडप्याचं दिलं उदाहरण; म्हणाले, “देशात जातीय दंगली…”

“मी कधीही एकच व्यवसाय नाही केला. मी १९८४ साली नोकरी सोडली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभा राहिलो. मी जिथून उभा राहिलो तिथे १८ टक्केच मराठी वस्ती होती. परंतु, तरीही पहिल्याच निवडणुकीत निवडून आलो. नारायण राणे पॅटर्न तयार करून ती निवडणूक जिंकलो, कारण वैचारिक दृष्ट्या निवडणूक जिंकणं अशक्य होतं”, असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला. तसंच, “शिवसेनेच्या जन्मानंतर जे केलं ते सांगण्यासारखं नव्हतं”, असंही ते म्हणाले.