मंगळवारी देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलंय. राष्ट्रवादीच्या खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता या प्रकरणावरुन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> अजित पवारांना भाषण करु न दिल्याबद्दल बोलताना भुजबळांकडून पंतप्रधानांचं कौतुक; म्हणाले, “तो मोदींचा मोठेपणा पण…”

प्रकरण काय?
देहूमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
political parties candidates celebrated rang panchami
रंग जल्लोष रामाचा अन् प्रणितीचा..
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

नक्की वाचा >> पंतप्रधान मोदींसमोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना दिली ‘एक्स्चेंज ऑफर’; म्हणाले, “फार मोठं आणि…”

सुत्रसंचालकाने थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यानंतर त्यांनी अजित पवारांकडे हात करत तुम्ही बोला असं सांगितलं. मात्र अजित पवार यांनी आपण बोलावं अशी भूमिका घेत मोदींकडे पाहून भाषणासाठीच्या पोडियमकडे हात केला. या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे असं म्हटलंय. या साऱ्या प्रकरणावर व्यक्त होतना निलेश राणेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला

“उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलायला संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाचे कौतुक करणं त्यांना सुचलं नाही,” असा टोला निशेल राणेंनी ट्विटरवरुन लागवलाय. पुढे बोलताना त्यांनी, “खासदार सुळे टीव्हीवरील फुटेज बघा. हजारो वारकरी या कार्यक्रमाला आले होते. त्या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम तुम्ही केले,” असंही म्हटलंय.

या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली नसली तर रोहित पवार, छगन भुजबळ, आशिष शेलार, यशोमती ठाकूर, अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावरुन भाष्य केल्याचं पहायला मिळालं आहे. या प्रकरणासंदर्भात मतप्रदर्शन करणाऱ्यांमध्ये आता निलेश राणेंच्या नावाची भर पडलीय.