scorecardresearch

… म्हणून नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आता सोमवारी होणार सुनावणी

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

nitesh rane
(प्रातिनिधिक छायाचित्र)

भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय खटला वर्ग करण्यावर देखील सोमवारीच सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी वेळ मागितला असल्याने, सुनावणी सोमवारी होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी तत्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता आणि आपली बाजू मांडली होती. यावर न्यायालयाने आज (शनिवार) दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार नितेश राणेंचे वकील न्यायालयात आज हजर झाले होते मात्र सरकारी विशेष वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करत वेळ मागितल्याने ही सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.

शिवसैनिक हल्लाप्रकरणी नितेश राणे, राकेश परब यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

कणकवली करंजे येथील शिवसैनिक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे बँक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडे आमदार नितेश राणे व पीए राकेश परब आदींची नावे समोर आली होती त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2022 at 17:45 IST

संबंधित बातम्या