काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. निती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून महागाई, गरिबी, बेरोजगारी, पिण्याचे पाणी, स्वच्छतेसह मोदी सरकारच्या विविध योजनांच्या मुद्द्य्यावरून सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

“निती आयोगाने मोदी सरकारच्या प्रपोगांडाचा व बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा फाडला आहे.” असं सचिन सावंत ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.

तसेच, १.देशातील ५८.५% जनता स्वयंपाक गॅसपासून वंचित, २. ५२% शौचालयादी स्वच्छतेपासून वंचित, ३. १४.६% पिण्याच्या पाण्यापासून वंचित, ४. ४५.६% घरांपासून वंचित, ५. ९.७% जनता बँक खात्यांपासून वंचित आहे अशी आकडेवारी देखील सचिन सावंत यांनी ट्विटसोबत दिली आहे.