शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आज ३० पेक्षा जास्त आमदार आहेत. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथे मुक्कामी आहेत. याच कारणामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर अगोदर बंडखोर आमदारांसोबत गेलेले आणि गुवाहाटी येथून परतलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. आज गेले आहात पण उद्या संपून जाल असा इशारादेखील आमदार नितीन देशमुख यांनी या बंडखोर आमदारांना दिला आहे.

हेही वाचा >>> शरद पवार अॅक्शन मोडमध्ये! राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं, उद्या होणार महत्त्वाची बैठक

Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले
Hemant Godse
अस्वस्थ खासदार हेमंत गोडसे कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी, अन्याय होणार नसल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

“या सर्व घडामोडीच्या मागे नाव एकनाथ शिंदे यांचे असले तरी यामागे भाजपा आहे. नितीन देशमुख म्हणून मला लोकांनी मत दिले नाही. माझ्या पदाधिकऱ्यांनी माझ्या विजयासाठी जीवाचं रान केलं. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिलं. आज काही आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत. कोणी दुसऱ्यांदा तर कोणी तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. माझी त्यांना एक विनंती आहे. तुम्ही आमदार झाले आहेत. तुम्ही स्वबळावर आमदार झाले नाही आहात. आपल्या मागे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता. शिवसैनिकांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं. ज्या मतदारांनी तुम्हाला शिवसैनिक म्हणून निवडून दिलं त्यांचा आदर करा. या सर्व गोष्टीचां विचार करुन परत या. आज तुम्ही गेलात उद्या संपून जाल,” असे देशमुख म्हणाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर अतुल भातखळकरांचा खोचक टोला; म्हणाले, “पांचट कोट्यांचा…”

तसेच, “शिंदे यांच्यासोबत आमदार जातील, शिवसैनिक जाणार नाहीत. मतदारही जाणार नाहीत. आमदार गेला म्हणून पक्ष संपत नसतो. पक्ष हा पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. माझी शिंदे यांनादेखील परत येण्याची विनंती आहे,” असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा >>> “आमचं ठरल्यानंतर शरद पवार बाजूच्या खोलीत जाऊन म्हणाले…”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण!

तसेच, ज्या बाळासाहेबांच्या नावावर मोठे झाले, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आज देशाचे मुख्यमंत्री आहेत. हे सर्व भाजापचे षड्यंत्र आहे. काही आमदार ईडीच्या दबावाला बळी पडले आहेत. बऱ्याच नेत्यांवर ईडीचा दबाव टाकून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. भाजपात धमक असेल तर निवडणुका लावून दाखवा. जनतेसमोर या. जनतेची ताकद तुम्हाला कळेल. माझी इच्छा आहे की निवडणुका लागायला पाहिजेत. तेव्हाच कोणाची ताकद कळेल,” असे आव्हानदेखील त्यांनी भाजपाला दिले.