Shiv Sangram Chief Vinayak Mete Death शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी मेटेंच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.

विनायक मेटेंचा महाराष्ट्राच्या विकास कामांमध्ये सहभाग

Ajit Pawar, Raj Thackeray,
राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Shrikant Shinde
“कुवतीपेक्षा जास्त झेपत नसेल तर…”, खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
supporters of mp hemant patil in mumbai to meet cm eknath shinde after bjp claim hingoli seat
Lok Sabha Election 2024 : उमेदवारी बदलण्याच्या चर्चेनंतर खासदार हेमंत पाटील यांचे समर्थक मुंबईत

विनायक मेटे यांचं अपघाती निधन हे दुर्देवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. मेटे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. अनेक वेळा त्यांची आणि माझी भेट झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे. त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांचा अपघाती निधन हे महाराष्ट्रचं मोठे नुकसान असून आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- चालकाच्या डुलकीमुळे विनायक मेटेंच्या गाडीला अपघात? अजित पवार म्हणतात, “रात्रीच्या प्रवासामुळे…!”

अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली
रस्त्यात अपघात होतात त्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडतात. भारतीय नागरिकांनी आता संवेदनशील बनायला हवं. या अपघाताचा नेमकं कारण मला माहीत नाही. मात्र संपूर्ण भारताला अपघात मुक्त करणे हीच विनायक मेटे यांना वाहलेली खरी श्रद्धांजली असेल, असे म्हणत गडकरींनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा- विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता फडणवीसांना केला होता मेसेज; काय होतं त्यात? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

कसा झाला अपघात?

विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. “आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात ५ वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”, अशी माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी ‘एबीपी’शी बोलताना दिली.