Nitin Gadkari On Delhi’s Air Pollution : वाढत्या प्रदूषणामुळे, दिल्लीला जाऊ वाटत नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यावेळी दिल्लीत राहायला आवडत नसल्याचे म्हणत प्रदूषमामुळे त्यांना संसर्ग होतो, असेही गडकरी यांनी सांगितले.

गडकरींना दिल्ली का आवडत नाही?

एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “दिल्ली असे शहर आहे जिथे मला राहायला आवडत नाही. इथल्या प्रदूषणामुळे मला संसर्ग होतो. जेव्हा जेव्हा मी दिल्लीला निघतो तेव्हा तेव्हा मला वाटते की, दिल्लीला जायला पाहिजे की नाही. इतके भयंकर प्रदूषण आहे.” पेट्रोल-डिझेलचा खप आणि वापर कमी करणे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग असल्याचेही यावेळी नितीन गडकरी म्हणाले.

PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
loksatta readers feedback
लोकमानस: पिढ्या बरबाद करणारे धोरण
Air in Borivali , Byculla Air , Navinagar , Shivajinagar,
बोरिवली आणि भायखळ्यातील हवा सुधारली, निर्बंध उठवण्याची शक्यता, नेव्हीनगर आणि शिवाजीनगरवर लक्ष
aam aadmi party is disaster
आप नव्हे आपदा, पंतप्रधानांचे दिल्लीतील कार्यक्रमात टीकास्त्र
Nitin Gadkari statement on air pollution Nagpur news
नितीन गडकरी म्हणतात… ४० टक्के वायू प्रदुषणाला आमचेच मंत्रालय जबाबदार
Mahadev Jankar on Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : “एखादा पक्ष काढा आम्ही तुमच्याबरोबर युती करू”; भुजबळांना महादेव जानकरांचा सल्ला
ordered to conduct activities in schools for Republic Day
शाळेतच दारू आणि अनागोंदी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांची नोटीस,  संस्थाचालक म्हणतात ….

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारत २२ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल-डिझेलसह जीवाश्म इंधन खरेदी करतो. हे अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप आव्हानात्मक आहे. त्यांनी पुढे, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करत आणि पर्यांयी इंधनाचा वापर करत आपण प्रदूषण कसे कमी करू शकतो हेसुद्धा सांगितले.

गरीबी, बेरोजगारीवरही भाष्य

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात देशातील गरीबी आणि बेरोजगारीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “भारतात गरीबी आणि बेरोजगारी या सर्वात मोठ्या समस्या आहेत. देशाच्या प्रगतीसह अशा योजना आखायला हव्यात की, ज्यातून अर्थिक आणि समाजिक विकास साधता येईल.”

हे ही वाचा : मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपा हायकमांडने एकनाथ शिंदेंना काय सांगितले? रामदास आठवले म्हणाले…

दिल्लीकरांना दिलासा

नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्याची सुरुवात दिल्लीकरांसाठी दिलासादायक ठरली कारण, दोन-तीन दिवसांत AQI ४०० च्या खाली आला आहे. जो नोव्हेंबरमध्ये ४०० च्या वर असायचा. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, दिल्लीतील शाळांना सुट्टी देण्याची वेळ आली होती. याचबरोबर सरकारने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्याही मर्यादित केली होती.

हे ही वाचा : “मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी; मनसेचं खळखट्याक!

हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

मंगळवारी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत थोडी सुधारणा झाली आहे. वायू प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीकरांना दिलासा देणारा हा सलग तिसरा दिवस आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजता दिल्लीचा AQI २७४ इतका नोंदवला गेला. तर सोमवारी, दिल्लीचा २४ तासांचा AQI २८० होता.

Story img Loader