भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकेतच निधन झाले असून जगताप कुटुंबीयांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तीन जानेवारी रोजी लक्ष्मण जगताप यांचे उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यानंतर सर्व पक्षीय नेते जगताप कुटुंबियांची भेट घेत आहेत. दिवंगत लक्ष्मण जगतापांची सर्व राजकीय पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू शंकर जगताप यांचे सांत्वन केले. यावेळी इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तीन जानेवारी रोजी भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने भाजपामध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील एक मातब्बर नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. काही महिन्यांपूर्वी त्यांना दुर्धर आजार झाल्याचे निष्पन्न आले होते. त्याच आजाराचा सामना करताना उपचारादरम्यान जगताप यांचे निधन झाले. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह अनेक सर्व पक्षीय नेत्यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेतली. जगताप कुटूंबियांच्या दुःखात सहभागी झाले. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी जगताप यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू शंकर जगताप यांच्याशी संवाद साधला.