लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडला. शिवसेनेच्या या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकेची तोफ डागली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी चांगलीच टीका केली. एवढंच नाही तर हे सरकार कोसळलं पाहिजे आणि मध्यावधी निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणजे आपण जिंकून येऊ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“भाजपाला या लोकसभा निवडणुकीत चांगलाच तडाखा बसला. पण गोष्टी वळवायच्या कशा? हे त्यांना बरोबर समजलं आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर पुन्हा सुरु केलं की उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएबरोबर जायचं. मी तुम्हाला विचारतोय जायचं ?” उद्धव ठाकरेंनी हे विचारताच नाही असं उत्तर समोरच्या गर्दीने दिलं. “तुमचं तुम्ही बघा की..काय काय उघडं पडलं ते बघा.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठघराणेशाही म्हटल्यावर थोडी घराणेशाही माझ्या शब्दांमध्ये येतेच. त्यामुळेच मी म्हटलं की यांची फाटली आहे. उद्धव ठाकरे एनडीएत जाणार अशा चर्चा, मग भुजबळ शिवसेनेत जाणार. भुजबळ माझ्याशी बोलले नाहीत. ते मंत्री आहेत ते बघतील काय करायचं. मात्र सांगड घालण्याचा आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय.”

Raola government central unstable Criticism of Mamata Banerjee
केंद्रातील राओला सरकार अस्थिर; ममता बॅनर्जीं यांची टीका
devendra fadnavis
“ठाकरे सरकारमुळेच मराठा आरक्षण रद्द झालं”; देवेंद्र फडणवीसांची टीका; म्हणजे, “आज जे राजकारण सुरू आहे…”
Chandrasekhar Bawankule, BJP, eknath Shinde, devednra Fadnavis, Chandrasekhar Bawankule Criticizes Opposition for False Claiming on Government Schemes , Ajit Pawar, Jan Samwad Yatra, opposition banners, OBC-Maratha reservation, Chhagan Bhujbal, Sharad Pawar,
बावनकुळे म्हणाले “मुले कोणाची…बारसे कोण करतय…”
Jitendra Awhad, Eknath shinde, Jitendra Awhad give statement about Eknath shinde, funds distributio, Jitendra Awhad criticise ajit pawar, thane news, latest news,
तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे होते, अजितदादांनी मला हरविण्याचा प्रयत्न चालवला; जितेंद्र आव्हाड यांची टोलेबाजी
arvind kejriwal health
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : विरोधकांनी ही संधी सोडू नये!
Nana Patole Criticizes mahayuti Government over Ladki Bahin Yojana, Congress, Nana Patole, Congress State President Nana Patole, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024, Election Gimmick, marathi news,
“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती अक्कल महायुती सरकारमध्ये…,” नाना पटोलेंची टीका
Narendra Modi And Rahul Gandhi (4)
“हिंदू समाजाविरोधातील अपमानजनक वक्तव्ये योगायोग की…”, मोदींचं काँग्रेसविरोधात सूचक विधान; म्हणाले, “देवाच्या रुपांचा…”

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला, “पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता गाणं गात आहेत, मला जाऊ द्या ना घरी..”

पुन्हा निवडणूक झाली तर आजचे लढवय्ये उद्या खासदार होतील

पुन्हा निवडणूक झाली पाहिजे, कारण आज ज्यांचा सत्कार केला ते उद्या खासदार होतील. आपल्यावर आरोप केला जातोय की शिवसेनेला हिंदू मतं नाहीत, मुस्लीम मतं पडली आहेत. हो पडली आहेत, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणत आहेत. डोमकावळे आज जमले आहेत त्यांची कावकाव सुरु झाली आहे. मी हिंदुत्व वगैरे सोडलेलं नाही.

चंद्राबाबू आणि नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत?

“देशातली लोकशाही वाचवण्यासाठी हिंदुत्व सोडलंय असं नरेंद्र मोदी म्हणत असतील तर नरेंद्र मोदींनी भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आहे. हा माझा आरोप आहे. २०१४ आणि २०१९ यावेळी जे फोटो आहेत ते बघा. आज भाजपाबरोबर कोण बसलं आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार ते काय हिंदुत्ववादी आहेत? आंध्रात चंद्राबाबूंनी मुस्लीम समाजाला वचनं दिलेली नाहीत का? नितीश कुमारांनी मुस्लीम समाजाला वचनं दिलेली नाहीत का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाषणात केला.

मुस्लीम समाज आमच्या बाजूने आहेच

“मुस्लीम समाज आमच्याबरोबर आहेच कारण आम्ही वार करु तर समोरुन करु, यांच्यासारखा पाठीत वार करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मिंधे यांनी शहरी नक्षलवादाचा मुद्दा काढला. हुकूमशाही मोडा हा जर तुम्हाला आतंकवाद वाटतो का? देशाचं संविधान वाचवणं हा आतंकवाद वाटत असेल तर मी आतंकवादी आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तुमचे जे बापजादे दिल्लीत बसलेत ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत. रवींद्र वायकरांनी सांगितलं की माझ्यापुढे मार्गच नव्हता तुरुंगात जा की आमच्याकडे या. तो भ्रष्ट माणूस हे सांगतो हा तुमचा शासकीय नक्षलवाद नाही का? पक्ष फोडायचे, सरकार पाडायचं, फोडलेल्या लोकांना मंत्रिपदं द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.