मराठा आरक्षणासाठी ८ जून पासून उपोषण सुरु केलेल्या मनोज जरांगेंनी आज सहाव्या दिवशी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. सगे-सोयऱ्यांच्या अंमलजावणीसाठी त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक महिन्यात सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर नाव घेऊन उमेदवार पाडू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे यांनी याआधीही आंदोलनं केली आहेत. त्या आंदोलनांमधून विविध तोडगेही निघालेले महाराष्ट्राने पाहिलं आहे. अशात मनोज जरांगेंनी महत्त्वाचा इशारा सरकारला दिला आहे.

शंभूराज देसाईंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज अंतरावाली सराटीत जाऊन मराठा आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी मनोज जरांगे यांना दिली. “सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकार दिरंगाई करत आहे, असा गैरसमज मनोज जरांगेंनी यांनी करू घेऊ नये, त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा”, असं यावेळी शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

Jayant Patil On Ajit Pawar
“मोदी सरकारच्या घोषणा म्हणजे वाऱ्यावरची वरात”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचं टीकास्र; म्हणाले, “राज्यातल्या खासदारांनी…”
‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
jitendra awhad latest news
“शिंदे सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिला नाही”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “मी अजित पवारांच्या…”
Case, Special Public Prosecutor,
माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
jayant patil latest news,
“…म्हणून हा पळपुटेपणा शिंदे सरकारने केला आहे”, पुरवणी मागण्यांवरून जयंत पाटलांचं टीकास्र!
Pressure from the rulers to give loans without seeing the farmer CIBIL
शेतकरीसरकारच्या कात्रीत बँका; ‘सिबिल’ न पाहता कर्ज देण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव
Criticism of MLA Ganesh Naik over land transfer to CIDCO Govt
सिडको, शासनात बिल्डरांचे दलाल; भाजप आमदार गणेश नाईकांचा सरकारला घरचा आहेर; भूखंड हस्तांतरणावरून टीका
BJP, BJP s kedar sathe, Ramdas Kadam, shivsena, BJP s kedar sathe Warns Ramdas Kadam Over Offensive Remarks, Dapoli Constituency, Guhagar Constituencies, ratnagiri, maharashtra assembly 2024, sattakaran article,
रामदास कदमांच्या विरोधात भाजपने दंड थोपटले

हे पण वाचा- मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिली एक महिन्याची मुदत

काय म्हणाले मनोज जरांगे?

“आम्ही दिलेल्या व्याखेप्रमाणे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत, त्यांचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा आणावा. हैदराबादचे गॅझेट आपल्या राज्यातही लागू करावं. सातारा संस्थानचं गॅझेट लागू करावं. आंतरवली सराटीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करावं. या मागण्या मनोज जरांगेंनी शंभूराज देसाईंकडे केल्या आहेत.

तर नावं घेऊन उमेदवार पाडणार

यानंतर मनोज जरांगे म्हणाले, “आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तर आम्ही आता राजकारणात उतरणार आहोत, तसंच नावं घेऊन उमेदवार पाडणार प्रसंगी काही ठिकाणी उमेदवार देणार नाही पण नावं घेऊन उमेदवार पाडणार एवढं लक्षात घ्या असा थेट इशाराही मनोज जरांगेंनी दिलं आहे. शंभूराज देसाईंनी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. त्यानुसार हा वेळ दिल्यावर जरांगे यांनी एक महिन्याचा वेळ देत उपोषण स्थगित केलं.

लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यातून धडा घेत भाजपा आणि महायुतीने कंबर कसून तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीने १८५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर आता मनोज जरांगेंनी नावं घेऊन उमेदवार पाडू असा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार नेमकं मराठा आरक्षणाबाबत आणि सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच सरकारने दिलेल्या मुदतीत अंमलबजावणी केली नाही तर मनोज जरांगे राजकारणात उतरणार का? तसंच कुणाकुणाला पाडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.