जिल्हय़ातील नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. त्यासाठी केंद्रीय निरीक्षक टी. व्ही. के. रेड्डी येथे दाखल झाले आहेत. दोन्ही मतदारसंघांसाठी स्वतंत्र निवडणूक खर्च विषयक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून तेही नगरमध्ये दाखल झाले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल कवडे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय निरीक्षक रेड्डी यांचे संपर्क अधिकारी म्हणून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे (मो. ९४२३५३४८७६) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्चविषयक निरीक्षक म्हणून अनिलकुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी मनपाचे अभियंता पी. जे. निकम (मो. ९५६१००४६५६) आहेत. शिर्डीसाठी निवडणूक खर्चविषयक निरीक्षक के. ए. चंद्रकुमार आहेत. त्यांचे संपर्क अधिकारी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. के. थोरात (मो. ८३७८०९२८६४) आहेत.
नगर मतदारसंघासाठी समन्वय अधिकारी म्हणून मनपा आयुक्त विजय कुलकर्णी (मो. ९९२२९१२४७८) व शिर्डीसाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू. एन. निर्मळ (मो. ९४२३१६१७३७) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.