मानहानीच्या आरोपाबाबत डिसलेंना नोटीस

अमेरिकेत जाऊन शैक्षणिक संशोधन करण्यासाठी डिसले यांनी रजेचा अर्ज केला होता

सोलापूर : अमेरिकन सरकारची फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्याप्रमाणे अमेरिकेत जाऊन शैक्षणिक संशोधन करण्यासाठी ग्लोबल टीचर पुरस्काराचे मानकरी रणजितसिंह डिसले यांनी मागितलेली संशोधन रजा प्रकरण गाजल्यानंतर आता स्वत: डिसलेंनी शिक्षण खात्यात आपला मानसिक छळ होतोय, अधिकारी पैसे मागतात आदी गंभीर आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी, शिक्षण विभागात कोणी, कधी आणि कसा मानसिक त्रास दिला, पैशाची मागणी कोणी, केव्हा आणि कशी केली, याचा खुलासा करावा, अशी नोटीस डिसलेंना बजावली आहे.

अमेरिकेत जाऊन शैक्षणिक संशोधन करण्यासाठी डिसले यांनी रजेचा अर्ज केला होता; परंतु या रजा प्रकरणानंतर त्यांच्याविषयी रोज नवनवे वाद पुढे येऊ लागले आहेत. हे प्रकरण राज्यभरात गाजले असता अखेर शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या आदेशानुसार डिसले यांची १५३ दिवसांची अध्यापन रजा झटक्यात मंजूर झाली आणि त्यांचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान ही रजा मंजूर होत नसल्याच्या काळात नाराजीचा सूर आळवताना डिसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जातोय, अधिकारी पैसे मागतात, असे गंभीर आरोप केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notice to ranjit singh disley on defamation charges zws

Next Story
वर्धा येथे भीषण अपघात ; वैद्यकीयच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू
फोटो गॅलरी