ठिय्या आंदोलनावेळी गोंधळ घालणारे मराठा आंदोलक नव्हते. मराठा आंदोलनात बाह्य शक्ती घुसल्याने हिंसाचार झाल्याचे स्पष्ट करत यापुढे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन होणार नसून तालुका व जिल्हास्तरावर साखळी उपोषण करणार असल्याचे  मराठा मोर्चा समन्वय समितीने जाहीर केले आहे. पुण्यात समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही शांततेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. काही ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुण्याच्या बैठकीत तसे ठरलेही होते. पण आंदोलनाला बाह्यशक्तींमुळे गालबोट लागले. आम्ही एक वाजता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून आम्ही सर्वांना घरी जाण्यास सांगितले. आम्ही तेथून गेल्यानंतर हा गोंधळ झाला. एका चांगल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनामध्ये तोडफोड करणारे समाजकंटक होते, असा आरोप त्यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now no protest on road for maratha reservation says maratha morcha coordinator in pune
First published on: 10-08-2018 at 16:25 IST