दुर्दैवी! पाच हजार महिलांना बाळंतपणासाठी मदत करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसूतीनंतर मृत्यू

तब्बल ५ हजार महिलांना बाळंतपणासाठी मदत करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसूतीनंतर उद्भवलेल्या काही समस्यांमुळे मृत्यू झाला.

nurse-covid
(प्रातिनिधीक छायाचित्र)

तब्बल ५ हजार महिलांना बाळंतपणासाठी मदत करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसूतीनंतर उद्भवलेल्या काही समस्यांमुळे मृत्यू झाला. ज्योती गवळी (३८) असं या परिचारिकेचं नाव आहे . ज्योती गवळी यांनी २  नोव्हेंबर रोजी हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता.  रविवारी नांदेड येथील रुग्णालयात न्यूमोनिया आणि इतर आजारांवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

“ज्योती गवळी या हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलच्या लेबर रूममध्ये कर्तव्यावर होत्या. त्यांनी गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केले आणि नंतर प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. प्रसूतीनंतर त्या मातृत्व रजेवर जाणार होत्या,” असे डॉं गोपाल कदम, हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी पीटीआयला सांगितले.

“गवळी या गेल्या दोन वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होत्या. यापूर्वी त्यांनी सुमारे तीन वर्षे इतर दोन आरोग्य केंद्रांमध्ये काम केले होते. २ नोव्हेंबर रोजी त्यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली. त्याच दिवशी, प्रसुतीदरम्यान काही समस्या उद्भवल्यामुळे त्यांना नांदेडमधील सरकारी वैद्यकीय सुविधेत पाठवण्यात आले. नंतर त्यांना न्यूमोनिया झाला, त्यामुळे नांदेडमधील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले आणि रविवारी त्यांचा मृत्यू झाला. ज्योती गवळी यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात पाच हजार महिलांना प्रसुतीसाठी मदत केली होती,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nurse who helped five thousand women during births dies of post delivery complications in nanded hrc

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या