बीड उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यासह खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल

वाहन तपासणी करुन योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मातिल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर अखेर उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक रविकिरण नागनाथ भड आणि एका खाजगी व्यक्क्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच मागणी प्रकरण; कथित दरपत्रकानंतर कारवाई

बीड

वाहन तपासणी करुन योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मातिल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर अखेर उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक रविकिरण नागनाथ भड आणि एका खाजगी व्यक्क्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने सप्टेंबर महिन्यात तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकार्‍यांकडून कोणत्या कार्यालयातून किती रुपयांची वसुली केली जाते याचे दरपत्रकच तक्रारी सोबत पाठवले होते. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरुन चौकशी झाल्यानंतर एका प्रकरणात कारवाई झाली. 

बीड येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवार दि. 20 जानेवारी रोजी उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक रविकिरण नागनाथ भड (वय 32) आणि खाजगी व्यक्ती प्रविण सीताराम गायकवाड या दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी वाहनांची तपासणी करुन योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी प्रतिवाहन पाचशे रुपयांप्रमाणे दोन हजार रुपये मागणी करत असल्याची तक्रार स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. मात्र कारवाई होत नसल्याने तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना तक्रारीसोबत लाचखोरी रोखणारे विभागातील अधिकारी कोणत्या कार्यालयाकडून किती वसुली करतो याचे दरपत्रकच जोडले होते. या तक्रारीनंतर गृहमंत्रालयाने वरिष्ठ पातळीवरुन चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराच्या सप्टेंबर मधील तक्रारीची चौकशी केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने अखेर गुरुवारी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत असुन तक्रारदाराने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत वेगवेगळ्या विभागाकडून लाचखोरी रोखणारे अधिकारीच कशी वसुली करतात याचे दरपत्रकच जाहीर झाल्याने हा विभाग आता संशयाच्या भोवर्‍यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Officer sub regional transport office ysh

Next Story
वाई तील गुळुंब येथे चित्रीकरण स्थळी दमबाजी करणाऱ्या नऊ जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी