सार्वजनिक शौचालयाच्या काम पूर्ण झाल्यानंतरचा धनादेश काढण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पैठण पंचायतीचे विस्तार अधिकारी तथा अडूळ ग्रामपंचायतीचे प्रशासक अशोक सूर्यभान घोडके (वय ३६) व ग्रामविकास अधिकारी बळीराम दगडू कळमकर यांना पकडण्यात आले. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सीमाभागातील कारवायांविरोधात कोल्हापुरात शनिवारी ‘मविआ’चे धरणे आंदोलन

तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या पथकाने अडूळ ग्रामपंचायतीत पंच साक्षीदारांसमोर कारवाई केली. लाचेच्या ४५ हजार रुपयांपैकी ४० हजार ग्रामविकास अधिकारी कळमकर यांनी तर ५ हजार अशोक घोडके यांनी घेतले. घोडके यांनी १० हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ हजार स्वीकारले. यातील तक्रारदाराच्या वहिनी या अडूळ ग्रामपंचायतीच्या सरपंच असताना स्वच्छ भारत अभियानांतर्गत अडूळ जिल्हा परिषद शाळेत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मंजूर झालेल्या २ लाख १० हजार बिलाचे धनादेश काढण्यासाठी घोडके यांनी १० हजार तर कळमकर यांनी ४० हजारांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officials of paithan panchayat samiti caught in a trap while accepting a bribe of 45 thousand dpj
First published on: 07-12-2022 at 21:27 IST