दोन मालमोटारींमध्ये समोरासमोर धडक लागून गुरुवारी झालेल्या अपघातात वृद्धा ठार झाली. तर ट्रॅक्स चालकासह सोळा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. कात्यायनी जवळ घोटणेमळा येथे झालेल्या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव अनसूया शामराव कांबळे (वय ७०, रा. दोनवडे, ता.भुदरगड) असे आहे. अपघाताची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
गारगोटी-कोल्हापूर वडाप करणारी ट्रॅक्स आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गारगोटीहून कोल्हापूरला प्रवासी घेऊन निघाली होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्स कात्यायनी पेट्रोल पंपाजवळील घोटणे मळ्याजवळ असलेल्या वळणावर आली असता कोल्हापूरहून गारगोटीच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकची व ट्रॅक्सची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अनसूया शामराव कांबळे व ट्रॅक्स चालक धनाजी बंडोपंत कांबळे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान अनसूया यांचे निधन झाले. या ट्रॅक्समधील इतर पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांची नावे अशी, अभिजित वसंतराव देसाई (रा. गारगोटी), लक्ष्मण बाबुराव कुंभार (रा. शेणगाव), गोराबाई दत्ताजी कांबळे (रा. दोनवडे), सूरज जयसिंग कांबळे (रा. गारगोटी), सुरेश महादेव रावळ (रा. गारगोटी), सरदार रामचंद्र मोरे  (रा. कोनवडे), साताप्पा श्रीपती फराकटे (रा. दिंडेवाडी), मोहन वसंत पाटील ( रा. गडबिक्री), सागर बाबुराव कांबळे (रा. निगावे खालसा), सुनील केशव कांबळे (रा. निगावे खालसा), मोहन बाबासाहेब देसाई (रा. पुष्पनगर ता. भुदरगड), दिलीप दिनकर पोवार (रा. आडोली), दिलीप बाबुराव कुंभार, सुभाष शांतीनाथ कुंभार (दोघेही रा शेणगाव), सुनील दत्तात्रय कांबळे (रा. दोनवडे). माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप कोंडेकर हे आपल्या खासगी वाहनातून कोल्हापूरकडे येत होते. त्यांनी जखमींना सीपीआरमध्ये आणण्यास मदत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old woman killed in motor accident
First published on: 18-07-2014 at 03:44 IST