Devendra Fadnavis on EVM hack charge: विधानसभा निवडणुकीचा लागल्यानंतर महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाल्याचे दिसले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. ४८ पैकी ३० जागांवर थेट विजय आणि एका ठिकाणी अपक्षाचा विजय झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मविआचे सपशेल पानिपत झाले. निकालानंतर विरोधकांकडून आणि विशेषतः काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएमच्या विरोधात आक्षेप घेण्यात येत आहे. या आक्षेपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. विरोधक विनाकारण त्रागा करत असल्याचे ते म्हणाले. यासाठी त्यांनी लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे उदाहरण दिले.

इंडिया टुडे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईव्हीएमबद्दल विरोधक आरोप करत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, “विरोधक पराभवाचे आत्मचिंतन न करता जोपर्यंत स्वतः सत्य स्वीकारत नाही, तोपर्यंत त्यांचा पक्ष पुढे येणार नाही.” हे सांगत असताना फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील देशमुख बंधूंच्या लढतीचा आणि नांदेडमधील लोकसभा पोटनिवडणुकीचा हवाला दिला.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

हे वाचा >> CM Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी कसे तयार झाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “लातूर जिल्ह्यात लातूर शहर विधानसभेत अमित विलासराव देशमुख आणि लातूर ग्रामीणमध्ये धीरज विलासराव देशमुख निवडणूक लढवत होते. त्यापैकी धीरज देशमुख यांचा पराभव झाला. तर अमित देशमुख यांचा विजय झाला. म्हणजे लातूर ग्रामीणमध्ये ईव्हीएम हॅक झाले, पण लातूर शहरात ते झाले नाही का? अशाच प्रकारे ते लोकसभेला जिंकले, तेव्हा ईव्हीएममध्ये काहीच अडचण नव्हती का?”

तसेच झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा विजय झाला, तिथे त्यांना ईव्हीएमवर शंका नाही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्यावेळी आम्ही नांदेडमध्ये जिंकलो, पण त्याच दिवशी लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला. तिथेही त्यांना काही अडचण वाटली नाही. त्यामुळे काँग्रेसने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

हे ही वाचा >> “शपथविधीअगोदर खूप मीम्स आले, आम्ही तिघे…”, फडणवीसांनी सांगितलं ट्रोलर्सचं आवडतं मीम; अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

लातूरमध्ये काय निकाल लागला?

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत अमित विलासराव देशमुख यांनी विजय मिळविला. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाच्या नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी त्यांना कडवी झुंज देत तब्बल १,०६,७१२ मते मिळवली. अमित देशमुख यांनी ७,३९८ च्या मताधिक्याने विजय मिळविला.

LATUR CITY Assembly Constituency Election Results
लातूर शहर विधानसभेचा निकाल

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांचे कनिष्ठ बंधू धीरज देशमुख निवडणुकीला उभे होते. दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या धीरज देशमुख यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे रमेश कराड यांनी तब्बल १,१२,०५१ मते मिळवत धीरज देशमुखांचा ६५९५ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. तर धीरज देशमुख यांना १,०५,४५६ एवढी मते मिळाली.

n

Story img Loader