शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटीविष्य स्वत: राज ठाकरे सांगतानाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.

“जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात, राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अखेरचा ‘राज’कीय संवाद !” असं मनसेने ट्वीट केलं आहे.

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?

हेही वाचा – “शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना…” बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांचा विरोधकांवर निशाणा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्वीट करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये राज ठाकरे म्हणताना दिसतात की, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होते, मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावलं, माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं.”

याचबरोबर, “जेव्हा मुलाखतकाराने मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेंचं बंडं आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्यात. हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलेलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.” असंही राज ठाकरे म्हणले आहेत.”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून दोन्ही गटांमधील संघर्षही अद्याप संपलेला नाही. त्यातच आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदतही संपत आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. दरम्यान, सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही गटांकडून बाळासाहेबांची जयंती साजरी केली जाणार आहे.