scorecardresearch

सोलापूर : चैत्री एकादशी निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न; दोन लाखांहून अधिक भाविक पंढरीत

चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली.

Chaitri Ekadashi
चैत्री एकादशी निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न; दोन लाखांहून अधिक भाविक पंढरीत (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

पंढरपूर : चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी कुटुंबियासमवेत, तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्या ॲड. माधवी निगडे यांनी कुटुंबीयांसमवेत केली. चैत्री एकादशी निमित्त मंदिरात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे.

वारकरी संप्रदायातील महत्त्वाची वारीपैकी चैत्री वारी. चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाइव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनरांग दर्शनमंडप, मंदिर व मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे.

हेही वाचा – “मविआच्या संभाजीनगरमधील सभेत हारतुरे, स्वागत समारंभ नसणार” अंबादास दानवेंची माहिती, म्हणाले, “बाबासाहेबांच्या घटनेचं…”

हेही वाचा – वीज दरवाढीचा शॉक! ग्राहकांवर वीज वापरासाठी किती पडणार भुर्दंड जाणून घ्या..

श्री. संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. दर्शनरांगेत मोफत खिचडी व ताक वाटप करण्यात येत आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. या वारीला मराठवाडा, कोकण, कर्नाटक येथून भाविक दरवर्षी न चुकता येतात. एकंदरीत पंढरी टाळ मृदुंग आणि हरी नामाच्या जयघोषाने पंढरी दुमदुमून निघाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 11:54 IST

संबंधित बातम्या