१३८ व्या जयंती निमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या’ बायोपिकची घोषणा

महेश मांजरेकर करणार ‘स्वातंत्रवीर सावरकर’ सिनेमाचं दिग्दर्शन

veer-savrkar-bollywood, movie

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारं व्यक्तीमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. खरं तर स्वातंत्र्य लढात सावकरांच्या असलेल्या योगदानावर आजवर अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. सावरकरांचे देशात जितके समर्थक आहेत तितकेच टीकाकार. अशातच सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केलीय. या सिनेमातून सावरकरांबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा संदीप या सिनेमातून करणार आहेत.

संदीप सिंह यांनी सिनेमाचा फर्स्ट लूक देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. “स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणं अजून बाकी आहे. वीर सावरकरांना लवकरच भेटा.”असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय.  पुढे संदीप म्हणाले, “एकीकडे सावकरांचा आदर केला जातो तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते.  मला वाटतं त्यांच्याबद्दल लोकांना फारसं माहित नसल्याने असं होतं. मात्र स्वातंत्र्य लढ्याचा ते महत्वाचा भाग होते ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ” असं संदीप सिंह म्हणाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandeep Singh (@officialsandipssingh)

 

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ऋषि विरमानी आणि महेश मांजरेकर यांनी सिनेमाची कथा लिहली आहे. तर अद्याप सिनेमातील कलाकारांची मात्र घोषणा करण्यात आलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: On veer savarkar death anniversary film maker sandeep singh announced biopic on savarkar kpw

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या