नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सणाला गालबोट लागणारी एक घटना तुळजाभवानीच्या मंदिरात घडली आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिरात मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून, १९ भावीक जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हरिदास कपाले असे मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे. कपाले हे सोलापूरचे रहिवाशी होते. आज नवरात्रीचा पहिलाच दिवस असल्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जवळपास अडीच लाख भाविक भवानी मंदिरात जमलेले होते.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा