गावठी हातबॉम्ब स्फोटात एकाचा मृत्यू, दोघे जखमी ; माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील घटना

या घटनेची माहिती मिलताच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनीही माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.

अलिबाग — माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोटात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक १० वर्षीय मुलगा आणि महिला किरकोळ जखमी झाली आहे. घटनास्थळी २५ हातबॉम्ब सापडले आहेत. निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस अधीक तपास करत आहेत.

मयत संदेश आदिवासी चौहान (वय — ४५), त्यांची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय —४०), मुलगा सत्यम संदेश चौहान(वय —१०) सर्व रा. सुरजासिंह ४० गाव बिराहली ता.रिथी जि.कठनी राज्य मध्यप्रदेश यांनी हे माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदी शेजारी शेतातील माळरानात उघडय़ावर राहत होते. मंगळवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला त्यामध्ये संदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पी माजीनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी औषधोपचाराकरिता आणण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्यास अधिक औषधोपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिलताच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनीही माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. तर रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक अश्व्नाथ खेडकर यांनी त्वरित आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळाला भेट दिली. सदर घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येवून आरोपींवर भादवी सहिता कलम २८६, ३३७, ३३८ स्फोटक कायदा कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलिस करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One killed two injured as handmade bomb explodes in maharashtra s raigad zws

ताज्या बातम्या