scorecardresearch

सातारा;चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

शर्वरी सुधीर जाधव या एक वर्षीय मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले.

सातारा;चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

वाई:चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना  कर्मवीर नगर, कोडोली( ता. सातारा) येथे घडली. शर्वरी सुधीर जाधव असे त्या मुलीचे नाव आहे. शर्वरी सुधीर जाधव या एक वर्षीय मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले.

तिने चॉकलेट तोंडात टाकल्यानंतर ते तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली. यानंतर ती बेशुद्ध पडली. ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला तातडीने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याबाबतची खबर डॉ. साळुंखे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 22:21 IST

संबंधित बातम्या