scorecardresearch

पुणे: हिंजवडी, वाकडमधील दोन वेगवेगळ्या प्रकरणात २८ लाख रूपयांची ऑनलाइन फसवणूक

पहिल्या प्रकरणात नोकरी लावण्याच्या अमिषाने फसवणूक करण्यात आली तर दुसऱ्या प्रकरणात विमानतळावरून सोडवून देतो सांगत फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पुणे: हिंजवडी, वाकडमधील दोन वेगवेगळ्या प्रकरणात २८ लाख रूपयांची ऑनलाइन फसवणूक
हिंजवडी, वाकडला २८ लाख रूपयांची ऑनलाइन फसवणूक (प्रातिेनिधिक छायाचित्र)

हिंजवडी आणि वाकड येथील दोन स्वतंत्र प्रकरणात २८ लाख रूपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. हिंजवडी येथील प्रकरणात भूपेश तुकाराम नेहेते (वय-३७, रा. बावधन, पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- पुणे: अल्पवयीन मुलांकडून किराणा माल व्यापाऱ्याचा खून; दोन अल्पवयीन मुले ताब्यात

पहिल्या प्रकरणात नोकरी लावतो म्हणून वेगवेगळी कारणे सांगून चार आरोपींनी फिर्यादींकडून ऑनलाइन पद्धतीने १८ लाख ६४ हजार रूपये घेतले. मात्र, नोकरी लावली नाही आणि पैसे परत केले नाहीत. त्यामुळे नेहते यांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार, जोसेफ, रिंकू, अमन, मनिष अशा नावांच्या व्यक्तींविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खारगे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा- पुणे: महिलेवर बलात्कार प्रकरणी सनदी लेखापाल अटकेत

दुसऱ्या घटनेत वाकडच्या एका महिलेची साडे नऊ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अमेरिकेतून आलेले भेटवस्तूंचे पार्सल विमानतळावरून सोडवून घेण्यासाठी तसेच बँकेत खाते उघडण्याचे कारण सांगून ही रक्कम भरण्यास प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे. आरोपींचा शोध सुरू असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. जाधव पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:16 IST

संबंधित बातम्या