रत्नागिरी – चिपळूण शहरातील सेवानिवृत्त असलेल्या एका व्यक्तीला क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून तब्बल सहा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय हरी बापट (वय ७२) राहणार परांजपे स्कीम, एफ-२, बहादूरशेखनाका, चिपळूण यांनी या प्रकरणी गुरुवारी उशिरा तक्रार दाखल केली. बापट यांना १९ मार्च २०२५ रोजी फेसबुकवर ‘लाइफटाइम क्रेडिट कार्ड’ची एक जाहिरात दिसली. त्यांनी त्या जाहिरातीवर क्लिक करून फॉर्ममध्ये आपली माहिती भरली. त्यानंतर २० मार्च २०२५ रोजी बापट यांना अनोळखी मोबाईल नंबर ७४४९६८८५३९ आणि ८८१८८०५२३० वरून फोन आले. फोन करणाऱ्या अनोळखी व्यक्तींनी त्यांना क्रेडिट कार्ड पाहिजे आहे का? असे विचारले असता त्याच्या बोलण्याला फसून आपल्या एटीएम कार्डची सर्व माहिती दिली. यानंतर, बापट यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचे त्यांना बँकेच्या अॅपमध्ये दिसू लागले. खात्री केली असता, त्यांच्या आयडीबीआय बँकेच्या चिपळूण शाखेतील जॉइंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट तसेच एफडी मधून एकूण सहा लाख रुपये ऑनलाइन व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.