शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा; ११ लाखांचा दंड

दोन वेळा शस्त्रक्रिया करूनही नीट उपचार न झाल्याने तक्रारदार यांना दहिफळे हॉस्पिटलने घेतलेला उपचार खर्च तसेच कायमस्वरूपी वेदना आणि नुकसानीबद्दल ११ लाख १० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे.

दोन वेळा शस्त्रक्रिया करूनही नीट उपचार न झाल्याने तक्रारदार सखाराम प्रभाकर जगताप यांना दोन शस्त्रक्रियांसाठी दहिफळे हॉस्पिटलने घेतलेला उपचार खर्च १ लाख १५ हजार रुपये ९ टक्के व्याजाने परत करावा, तसेच कायमस्वरूपी वेदना आणि नुकसानीबद्दल ११ लाख १० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे.
न्यू हनुमाननगर भागात राहणाऱ्या सखाराम जगताप यांचा टँकर पुरविण्याचा व्यवसाय आहे. एका अपघातानंतर त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली होती. त्या बाजूचे हाड बसविण्यासाठी चेहऱ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. कमरेबाजूचे डाव्या बाजूचे हाड काढून डोळ्याच्या खालच्या व वरच्या भागात लावण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर तक्रारदार जगताप यांच्या डोळ्याचा त्रास तर तसाच राहिला. कंबरेचे दुखणेही वाढले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, असा अर्ज त्यांनी ग्राहक मंचात दिला होता. साक्षी-पुरावे व सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे रुग्णालयास दंड आकारण्याचा निर्णय ग्राहक मंचाचे अध्यक्ष एन. के. तुंगार, सदस्य किरण आर. ठोले व संध्या बारलिंगे यांनी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Operation carelessness 11 lac fine

ताज्या बातम्या