Maharashtra Politics Shivsena UBT Operation Tiger Highlights, 17 June 2026: दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून नेमक्या काय राजकीय घडामोडी घडत आहेत आणि कोणते खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत, याबद्दलची वेगवेगळी माहिती समोर येत आहे. शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा फूट पडली असतानाच, ठाकरे गटाने संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. ठाकरे गटाने थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत केवळ त्यांच्याच पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी सूचक पोस्ट लिहिली ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे, ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात दिल्लीत काय काय घडामोडी घडत आहेत हे या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया…

Live Updates

शिवसेना ऑपरेशन टायगर लाईव्ह अपडेट्स, Operation Tiger Shivsena UBT Live Updates, 17 June 2026

 

18:43 (IST) 17 Jun 2026

ऑपरेशन टायगर-लोटसमध्ये सरकार व्यस्त; शेतकरी मात्र वाऱ्यावर - अमोल मिटकरींची टीका

शेतकरी जगण्यासाठी सरकार प्रयत्न करत नाही, मात्र ‘ऑपरेशन टायगर’ आणि ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जात आहेत. हे जनतेला आवडत नाही. जे आज जात आहेत, त्यांना आज बरं वाटत असेल; मात्र २०२९ मध्ये त्यांना समजेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

18:34 (IST) 17 Jun 2026

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले 'ते' पाच खासदार कोण?

Uddhav Thackeray Shivsena Split News: शिवसेनेतील ९ खासदारांपैकी ६ खासदार बाहेर पडल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणारी अपात्रतेची कारवाई टळू शकते. मात्र अद्याप पाच जणांची नावे समोर येत आहेत. ...सविस्तर वाचा
18:12 (IST) 17 Jun 2026

“बेकायदेशीर अन् असंवैधानिक…”, कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांचं ठाकरे सेनेतील खासदारांच्या फुटीबाबत मोठं भाष्य

उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत दोन दिवसांपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. या ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. हे ६ बंडखोर खासदार स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

17:32 (IST) 17 Jun 2026

'खासदार संजय दिना पाटील आमच्याबरोबर', ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचा दावा

शिवसेनेचे (ठाकरे) मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोर खासदारांच्या गटात सहभाग घेतलेला नाही, ते आमच्याबरोबरच आहेत, असा दावा खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. काही वृत्तवाहिन्या चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचेही ते म्हणाले.

16:21 (IST) 17 Jun 2026

भाजपाचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मार्ग मोकळा? तृणमूलनंतर आता शिवसेनेत मोठी फूट; पाहा लोकसभेतील आकड्यांचा खेळ!

Delimitation Bill and TMC, Shiv Sena Split Political Analysis: तृणमूल काँग्रेस, शिवसेनेचे (ठाकरे) खासदार फुटल्यानंतर लोकसभेतील अंकगणित बदलत असून यामुळे इंडिया आघाडी कमकुवत होत आहे. याचा फायदा भाजपाला होणार का? याची चर्चा सध्या सुरू आहे. ...वाचा सविस्तर
16:05 (IST) 17 Jun 2026

आधी तृणमूल, मग ठाकरेंची सेना आणि आता समाजवादी पक्षात फुट पडणार? यूपीच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा

Samajwadi Party Split: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिल्याचा दावा राजभर यांनी केला असून, यामुळे यूपीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...अधिक वाचा
15:25 (IST) 17 Jun 2026

सुरक्षेच्या कारणास्तव खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ

राज्याच्या राजकारणात शिवसेना (UBT) मधील फुटीच्या चर्चांमुळे वातावरण तापलेले आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

15:18 (IST) 17 Jun 2026

"मनात नसले तरी आता ते पक्ष सोडतील "; 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांदरम्यान नरेश म्हस्केंचे विधान

शरद पवारांना काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला देणाऱ्या संजय राऊत यांनी किती कोटी घेतले, असा प्रश्नही नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. ...वाचा सविस्तर
14:54 (IST) 17 Jun 2026

उद्धव ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीला कसे पोहोचले? ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठी माहिती समोर

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू असून उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत आहे. या ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. याबाबत दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

सविस्तर वाचा

14:41 (IST) 17 Jun 2026

Rajabhau Waje : १०० कोटी अन् कर्जमुक्तीची ऑफर धुडकावली! ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे 'नॉट फॉर सेल'

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आलेली कोट्यवधी रुपयांची ऑफर आणि कर्जमुक्तीची संधी नाकारून उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली आहे. ...सविस्तर वाचा
14:40 (IST) 17 Jun 2026

शिवसेनेतील फुटीवर संभ्रम कायम

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे शिवसेनेच्या ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्यासाठी पत्र दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ...सविस्तर बातमी
14:33 (IST) 17 Jun 2026

'ऑपरेशन टायगर'! यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचे 'प्लॅनिंग' यशस्वी, जिल्ह्यात राजकीय भूकंप; शिवसेनेत एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहतील?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले 'ऑपरेशन टायगर' अखेर यशस्वी झाले. शिवसेना ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेल्या खासदार संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी दिलेले पत्र मंजूर झाले आहे. ...सविस्तर वाचा
14:20 (IST) 17 Jun 2026

उद्धव ठाकरेंनी जारी केला 'व्हिप'! सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश, खासदार अनिल देसाईंची माहिती

ठाकरे गटाच्या संसदीय मंडळाची गुरुवारी (१८ जून) एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...सविस्तर बातमी
13:28 (IST) 17 Jun 2026

लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं.., 'ऑपरेशन टायगर'वर रोहित पवारांच ट्वीट









लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. एकेका खासदाराचा रेट ८५ कोटी..??? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत. आज डोक्यावर दुष्काळाचं सावट आहे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ केलाय, मध्यमवर्गीयांना ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीत सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/2067130181454893456?s=20

13:13 (IST) 17 Jun 2026

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'! ठाकरे गटात पुन्हा फूट; बंडखोरी रोखण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मास्टरस्ट्रोक

Shiv Sena Thackeray MP Split crisis Maharashtra politics: पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडू नये आणि पक्षाची संसदीय ओळख कायम राहावी, यासाठी ठाकरे गटाकडून हा कायदेशीर पवित्रा घेण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
13:11 (IST) 17 Jun 2026

"तुम्ही अजूनही ठाकरेंबरोबरच आहात का?" प्रश्न विचारताच ओमराजे निंबाळकर निरुत्तर!

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून नेमक्या काय राजकीय घडामोडी घडत आहेत आणि कोणते खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत, याबद्दलची वेगवेगळी माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकरांना "तुम्ही अजूनही ठाकरेंबरोबरच आहात का?" प्रश्न विचारताच ते निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले.

13:01 (IST) 17 Jun 2026

आज राजकारण पाहून आत्मा हादरला - अंजली दमानिया

आज राजकारण पाहून आत्मा हादरला मी UBT गटाची अजिबात समर्थक नाही मी लोकशाही समर्थक आहे. मी UBT गटा विरुद्ध टोकाचे लढे दिले. पण आज जे होतय ते पाहवत नाही. ह्या ६ खासदार कुणा विरुद्ध लढले: संजय देशमुख हे हेमंत पाटील (शिंदे गट) भाऊसाहेब वाकचुरे हे सदाशिव लोखंडे (शिंदे गट) नागेश पाटील हे भाऊराव कदम (शिंदे गट) याचा अर्थ मतदाराने शिंदे गटाला पूर्णपणे नाकारले होते, मग ही मतदाराची प्रतारणा नाही का? हा मतदारांचा विश्वासघात नाही का? मतदारांनी कोणाला मत दिले? * एका चिन्हाला * एका विचारधारेला * खासदारांवर विश्वास ठेऊन आज या फोडाफोडीत खासदार विकले जात नाहीत तर मतदाराचा ‘विश्वास’ विकला जात आहे....अशी X पोस्ट अंजली दमानियांनी केली आहे.

https://twitter.com/anjali_damania/status/2067144184545644947?s=20

12:40 (IST) 17 Jun 2026

कॉक्रोच पार्टीचे लक्ष आता पंतप्रधान नरेंद्र मोदी; अभिजीत दीपके म्हणाले, आधी धर्मेंद्र प्रधान नंतर मोदी यांच्या राजीनाम्यासाठी…

नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई रस्त्यावर उतरली होती. यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ही राजीनामा मागण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. ...सविस्तर वाचा
12:06 (IST) 17 Jun 2026

“तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का?”; उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच अरविंद सावंत पत्रकार परिषदेत भडकले; काय घडलं?

‘ऑपरेशन टायगर’वरून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. शिवसेना (ठाकरे) पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज (१७ जून) दिल्लीत शिवसेना (ठाकरे) पक्षाची पत्रकार परिषद पार पडली.

सविस्तर वाचा

12:01 (IST) 17 Jun 2026

मालेगाव: शाळेच्या बँक खात्यांवर डल्ला? माजी मुख्याध्यापकासह कुटुंबीयांवर २८ लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

२८ लाख ५५ हजार २९० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजी मुख्याध्यापकासह त्यांच्या कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...सविस्तर बातमी
11:59 (IST) 17 Jun 2026

नगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी विखे-थोरात गटाची जुळणी !

जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असते. तिथे घडणारे पडसाद जिल्हा परिषदेसह सहकारी संस्थांच्या निवडणुकीत उमटतात. जिल्ह्याचे राजकारण सोयऱ्या-धायऱ्यांच्या (शरद पवारांच्या भाषेत 'सोधा पक्ष') हाती एकवटलेले आहे. ...वाचा सविस्तर
11:42 (IST) 17 Jun 2026

Video : रविकांत तुपकर यांचे आंदोलन पेटले ! खामगावात "एसडीओ" कार्यालय जाळण्याचा प्रयत्न! पेठ मार्गावर टायर जाळले

एसडीओ कार्यालय पेटवण्याचा अज्ञात आंदोलकांनी प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असे फलक झळकावून कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती हाती आली आहे. ...वाचा सविस्तर
11:41 (IST) 17 Jun 2026

धक्कादायक! फुटबॉल प्रशिक्षकाकडून १७ वर्षीय खेळाडू मुलीवर लैंगिक अत्याचार; वसईत खळबळ

वसईमध्ये एका १७ वर्षीय मुलीला फुटबॉल क्षेत्रात करिअर घडविण्याचे आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...अधिक वाचा
11:40 (IST) 17 Jun 2026

“तुमची रिक्षात फिरायची औकात नव्हती, आज खासगी विमानातून फिरता”; संजय राऊतांचा घणाघात

ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संबंधित खासदारांवर आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...वाचा सविस्तर
11:32 (IST) 17 Jun 2026

मिरा-भाईंदरनंतर वसई विरारवरही पाणीकपातीची टांगती तलवार?

अल निनो आणि पावसाच्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा लक्षणीयरीत्या घटला आहे. ...वाचा सविस्तर
11:26 (IST) 17 Jun 2026

अभिजित दीपके पोहोचले 'नीट' रद्दमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरी, कुटुंबियांशी चर्चेनंतर काय म्हणाले?

मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मनगिया येथील रहिवासी आकांक्षा चतुर्वेदी नागपुरात नीट परीक्षेची तयारी करीत होती. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे तिने २० मे रोजी पांढरोबोडी परिसरातील अजयनगर येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ...सविस्तर बातमी
11:25 (IST) 17 Jun 2026

"सरदार घरात बसणारा असेल तर सैन्य सोडून जाणारच", ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असतानाच शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ...वाचा सविस्तर
11:22 (IST) 17 Jun 2026

स्मार्ट मीटरच्या संदेशांमुळे संभ्रम, वीज वापरावर नियंत्रण मिळेल; महावितरणचा दावा

नवी मुंबईत महावितरणच्या '४८ तासांत स्मार्ट मीटर' संदेशामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...सविस्तर वाचा
11:21 (IST) 17 Jun 2026

"तीन मिनिटांत चारवेळा साईबाबांची शपथ घेतली", बंडखोर खासदारांबद्दल संजय राऊतांचा मातोश्रीवरील बैठकीबाबत मोठा खुलासा!

Sanjay Raut exposes Shiv Sena rebel MPs : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर कडाडून टीका केली आहे. ...वाचा सविस्तर

 Maharashtra Politics Live Updates | Operation Tiger Shivsena UBT Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स