राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाची आज सांगता झाली. हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास ठरले. अधिवेशनात शिंदे गट-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सत्ताधारी तसेच विरोधकांनीही समाधान व्यक्त केले. तर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून मी माझी जबाबदारी चोख पार पाडणार आहे. आजपासून एकही विधेयक चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा >>> “शिंदे-फडणवीस सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधीसाठी तयार राहा”; पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची गरज नाही. त्याचा उल्लेख प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मात्र सरकारचे धोरण हे जनतेच्या विरोधात जाणार असेल, तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. एकही कायदा या सभागृहात चर्चेशिवाय मंजूर होणार नाही,” असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा >>> Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, राज्याची काय स्थिती?

“अनेकदा गोंधळात एकाच दिवशी दहा-दहा बिले काढण्यात आली. जाणीपूर्वक गोंधळ केला जायचा आणि बिलं मंजूर केली जायची. मात्र यानंतर एकही कायदा या सभाग्रहात चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी सभागृहाचा विरोधी पक्षनेता म्हणून देतो. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या सहकार्याची गरज आहे,” असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> शेतकरी आत्महत्या ते मेट्रो प्रकल्प, नवं सरकार अडीच वर्षे कशावर काम करणार? मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तर सांगितलं, म्हणाले…

“जनता ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांकडे जाते. पण जनतेला तिकडे न्याय मिळाला नाही, तर लोक विरोधी पक्षनेत्याकडेही येतात. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी फार महत्त्वाची असते. सत्तेत नसतानाही चांगला विरोधी पक्षनेता राज्याच्या विकासामध्ये कशा प्रकारे योगदान देऊ शकतो याचे उदाहरण माझ्या अगदोर अनेकांनी घेालून दिलेले आहे. कधी कधी विरोधी पक्षनेत्याने अशा काही भूमिका घेतलेल्या आहेत, ज्यामुळे सरकारही अडचणीत आलेलं आहे,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.