संगमनेरमध्ये धार्मिक स्थळांच्या परिसरातील दारू दुकानांना विरोध

दुकान सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, दारू दुकानाचे मालक आणि व्यापारी संकुलाचे मालक यांनी संगनमत करून नियमबा वाइन शॉप आणण्याचा घाट घातला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

संगमनेर : न्यायालयाचे आदेश व सरकारचे नियम धुडकावत संगमनेर शहरातील पोलीस लाइन व मंदिर, मशिदीजवळ होणाऱ्या वाइन शॉपला दारूबंदी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. राज्य महामार्गालगत, निवासी परिसरात तसेच रुग्णालय आणि शिक्षण संस्था असणाऱ्या या भागात वाइन शॉप होऊ  नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संगमनेर शहरातील सावतामाळी नगर येथे बस स्थानक ते शिक्षण शास्त्र महाविद्यालय रस्त्यावर पोलीस लाइन शेजारी नव्याने झालेल्या एका व्यापारी संकुलामध्ये घारगाव येथून वाइन शॉप स्थलांतरित होऊ न येत आहे.

दुकान सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, दारू दुकानाचे मालक आणि व्यापारी संकुलाचे मालक यांनी संगनमत करून नियमबा वाइन शॉप आणण्याचा घाट घातला आहे. या संदर्भात दारुबंदी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मशीद ट्रस्ट यांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे तसेच संबंधित प्रशासकीय विभाग कडे तRोरी केल्या आहेत.

सावता माळीनगरमध्ये होणाऱ्या या ‘वाइन शॉप’च्या पाठीमागे अगदी खेटूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून थोडय़ाच अंतरावर मशीद आहे. हिंदू आणि मुस्लिमांचे धार्मिक स्थळ वाइन शॉप च्या अगदी जवळ आहे. तसेच वाइन शॉप च्या दुकानाची एक भिंत शहर पोलीस लाइनच्या कंपाउंडला खेटून आहे आणि एका बाजूला बीएड कॉलेज, पेटीट हायस्कूल आहे. तरीही या ठिकाणी दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत वाइन शॉप सुरू करण्याची परवानगी देऊ  नये, अशी मागण दारुबंदी मोहिमेच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे, हेरंब कुलकर्णी, नामदेव घुले, अ‍ॅड. मीनानाथ शेळके, अ‍ॅड. प्राची गवांदे, अ‍ॅड. संदीप नलावडे, नंदा वाणी यांनी व स्थानिक रहिवासी तसेच मशीद ट्रस्ट, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या भक्तांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Opposition liquor shops vicinity religious places sangamner ssh