scorecardresearch

“पालघरचं साधू हत्याकांड आणि कोल्हापूरचं गायींचं हत्याकांड हे…” संजय राऊत यांचा गंभीर आरोप

खासदार संजय राऊत यांनी गायींच्या मृत्यूवरून एकनाथ शिंदेंवर टीका

MP Sanjay Raut Serious Allegation on Eknath Shinde
काय म्हटलं आहे राऊत यांनी?

पालघरचं साधू हत्याकांड आणि कोल्हापूरच्या गायींचं हत्याकांड हे सारखंच आहे असं मी मानतो असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात ज्या गायींचा मृत्यू झाला ते मृत्यू हे हत्याकांडच आहे असं मी मानतो असंही राऊत म्हणाले आहेत. एवढंच काय जर आत्ता मिंधे आणि भाजपाचं राज्य नसतं तर केवढा गहजब झाला असता. हिंदू रक्षा मोर्चा, गो माता बचाओ चा मोर्चा निघाला असता. मात्र कोल्हापुरात झालेल्या गायींच्या मृत्यूंनंतर काहीही झालं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी गायींना चारा खाऊ घातला होता

कोल्हापूरमधल्या कणेरी मठात मुख्यमंत्री गेले होते, त्यांनी हाताने चारा गायींना खाऊ लागला. त्यानंतर या गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मी काही कुणावर आरोप करत नाही. या घटनेत ५० गायींचा मृत्यू झाला. पालघरच्या साधूंचं हत्याकांड आणि गायींचं हत्याकांड हे मी सारखंच मानतो. या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मिंधे गटासारखे चोर लफंगे आम्ही नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. डुप्लिकेट शिवसेनेने आम्हाला पदावरून काढून टाकलं तरी काही फरक पडत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ देशी गाईंच्या मृत्यूमुळे अचानक चर्चेत आला आहे. देशामध्ये अलीकडे गाय, गोमाता या संकल्पनेला महत्त्व दिले जात असताना हिंदुत्वाशी जवळीकीचे नाते सांगणाऱ्या कणेरी मठात रातोरात ५० हून अधिक देशी गाईंचा मृत्यू झाल्याने विविध अंगांनी चर्चा रंगते आहे. मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची कार्यशैली, राजकीय नातेसंबंध हे विषयही यानिमित्ताने चर्चिले जात आहेत अशातच संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केला आहे आता यावर सरकार काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

पालघरचं हत्याकांड काय आहे?

१६ एप्रिल २०२२ च्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन तर ३० हून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 14:14 IST