जमिनीच्या सातबाऱ्यात वारस नोंद व कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तलासरी मंडळ अधिकारी संजय पंढरीनाथ भंडारी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाने रंगेहात पकडले आहे.

तलासरी तालुक्यातील एका जमिनीच्या सातबाऱ्यात वारस नोंद केल्याने तसेच सातबाऱ्यातील बँकेच्या बोजा कमी करण्यासाठी भंडारी यांनी तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे दाखल केली गेली होती. तक्रारीत तथ्य असल्याची पडताळणी केल्यानंतर पथकाने मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. दरम्यान १५ हजारपैकी १० हजारांची लाच भंडारीने आज दुपारी स्वीकारली. त्याचक्षणी पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, हवालदार नवनाथ भगत, संजय सुतार, विलास भोये, सखाराम दोडे या पथकाने भंडारी याला रंगेहात पकडले व ताब्यात घेतले. पथकामार्फत पुढील कारवाई सुरू असून त्याच्यावर गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळत आहे.

Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी
property developers Kalyan seized
कल्याणमधील २६ विकासकांच्या ११४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ८८ हजार ८७६ चौरस मीटरच्या मालमत्तांचा लिलाव