धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने कवडास व धामणी धारण ओवरफ्लो झाले आहेत. धामणी धरणाचे पाच दरवाजे पाच सेमीने उघडले असून सुमारे ९ हजार५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणात सद्यस्थितीत ११८.६० मीटर पाणीसाठा आहे. तर कवडास धरणातून सुमारे ९ हजार २०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणे मिळून सूर्या नदीत १० वाजेपर्यंत सुमारे १४ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता सूर्या प्रकल्प कार्यालयाने वर्तवली आहे.

धरण क्षेत्रात आतापर्यंत ५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सूर्या प्रकल्पामार्फत कोणताही सतर्कतेचा इशारा दिला नसला तरी खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत असल्याचे संदेश पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना तसेच ग्रामसेवकांना दिले आहेत.